भद्रा किल्ल्लया (अमदावाद)

India / Gujarat / Ahmadabad / अमदावाद
 स्मारक (मेमोरियल), स्मारक (मोन्यूमेंट), तटबंदी, heritage (en)
 Upload a photo

मराठ्यांच्या राजवटीतील ऐतिहासिक भद्रा किल्ल्लयावरील शिलालेखाची दुरवस्था झाली असून, यामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या शिलालेखावर "महिलांना समान मालमत्ता अधिकार' अशा आशयाचा मजकूर असल्याने याला विशेष महत्त्व आहे. परंतु सध्या या शिलालेखाला तडे गेले असून, तो मोडकळीस आला आहे.

गुजरात विधानसभेत सुमारे आठ वर्षांपूर्वी तत्कालीन सभापती अशोक भट आणि महापौर अमित शहा यांनी पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणला मदत करण्याची विनंती करत या शिलालेखाची निगा राखण्याची विनंती केली होती. परंतु आजही त्याकडे दुर्लक्षच झाल्याची परिस्थिती आहे.

इसवी सन 1812 मधील या शिलालेखावर "महिलांनाही मालमत्तेत समान अधिकार असून, वडिलांच्या मालमत्तेत मुलीलाही समान वाटा दिला जावा' असा मजकूर आहे. त्याकाळचे मराठा सुभेदार चिमाजी रघुनाथ यांनी 10 ऑक्‍टोबर 1812 मध्ये याबाबतचे फर्मान काढत शिलालेख बसवला होता. याला विरोध करणाऱ्या हिंदूंना महादेवाला, तर मुसलमानांना अल्लाहला उत्तर द्यावे लागेल असेही म्हटले होते. परंतु हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने त्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. ग्रामस्थांनी शिलालेखात तडे दिसल्यानंतर याबाबत पुरातत्त्व खात्याला कळविले होते, परंतु अद्याप तरी याकडे कोणीही फिरकले नसल्याचे सांगितले जात आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   23°1'26"N   72°34'52"E
  •  14 किमी.
  •  17 किमी.
  •  74 किमी.
  •  76 किमी.
  •  109 किमी.
  •  120 किमी.
  •  204 किमी.
  •  272 किमी.
  •  377 किमी.
  •  395 किमी.
This article was last modified 8 वर्षांपूर्वी