बाळापूर शहराजवळील पुलास कुठलेच कठडे नाहीत

India / Maharashtra / Balapur /
 Upload a photo

मागच्या महिन्याच्या शेवटी एस. टी. महामंडळाची
बस खिरोडा येथील पूर्णा नदीच्या पात्रात कोसळली. १९
प्रवासी पाण्यात बुडून मरण पावले. १७ जण जखमी
झाले. अपघाताचे कारण काय, याची बरीच चर्चा झाली.
शेगाव आगारामधील जुन्या बसेस जाऊन नवीन बसेस
आलेल्या दिसतात. थोडाफार बदल झाला. पण, इतर
डेपोच्या बसेसकडे अपघात झाल्याशिवाय कुणीच लक्ष
देणार नाही का? अकोला येथे जाताना बाळापूर
शहराजवळील पुलास कुठलेच कठडे नाहीत. नदीला
पाणी बरेच आहे. पुलाचे वळण एवढे धोकादायक आहे
की, ड्रायव्हरचे कौशल्य पणाला लागते. अनेक वर्षांपासून
पूल तसाच आहे तसेच शहराच्या बाहेर पडताना असणारा
दुसरा पूलदेखील तसाच नादुरुस्त आहे. राज्य परिवहन
महामंडळाच्या वाहक-चालक संघटना, प्रवासी संघटना,
संबंधित आमदार-खासदार यांनी अशा अनेक पुलांचा
प्रश्न मार्गी लावावा. अपघात झाल्यानंतर संबंधित बसचा
ड्रायव्हर जबाबदार धरला जातो. तसेच इतर गोष्टींकरिता
जबाबदार विभाग आहेतच. आधीच अपघाताची काळजी
घेणे आवश्यक असावे. बाळापूरजवळील नदीपात्रावर
असलेल्या पुलावर ताबडतोब कठडे लावावेत म्हणजे
पुढील अपघाताची मालिका थांबेल.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°40'43"N   76°47'22"E
  •  330 किमी.
  •  374 किमी.
  •  395 किमी.
  •  428 किमी.
  •  432 किमी.
  •  761 किमी.
  •  833 किमी.
  •  924 किमी.
  •  1003 किमी.
  •  1042 किमी.
This article was last modified 12 वर्षांपूर्वी