शेगाव येथून १२ किलोमीटरवरील खिरोडा गावानजीक पूर्णा नदीच्या पुला

India / Maharashtra / Shegaon /
 Upload a photo

खिरोडा पुलाचे बांधकाम १९३० साली करण्यात आले होते. पुलाची उंची ३५ ते ४० फूट आहे. पुलाला दोन्ही बाजुचे कठडे नाहीत. सध्या या पुलावरील रहदारी वाढली असताना त्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नाही. पूर्णा नदीला पूर आल्यास या पुलावर १० ते १५ फूट पाणी असते. त्यामुळे अनेकदा या पुलावरील वाहतूक बंद असते. जिगाव प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर हा पूल पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे प्रशासन याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
शेगावहून पार्तुड्याकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस खिरोडा पुलावरून पूर्णा नदीत कोसळली. बुधवारी सकाळी १०.३० वाजतादरम्यान झालेल्या या भीषण अपघातात १९ प्रवाशी ठार तर १४ गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींवर अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये जवळपास ३३ प्रवाशी होते. बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या शेगाव आगाराची बस (एमएच १२ ईएफ/६८६७) ही कांद्रीकडे जात होती. शेगाव येथून १२ किलोमीटरवरील खिरोडा गावानजीक पूर्णा नदीच्या पुलावरून जात असताना बसचे समोरील टायर फुटले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून बस ३५ फूट खोल नदीच्या पात्रात कोसळली. नदीत आठ ते नऊ फूट पाणी असल्याने प्रवाशी बसमध्येच अडकले. मदतीसाठीच्या किंकाळ्या ऐकून गावकरी व परिसरातील शेतकरी धावून आले. प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यामुळे मदतकार्याला गती मिळाली. शेगाव संस्थानकडून रुग्णवाहिका व सेवाधारी घटनास्थळी पाठविण्यात आले. एक एक करीत तब्बल १७ मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींना बाहेर काढून शेगाव सईबाई मोटे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील १२ गंभीर जखमींना अकोला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खामगाव येथून क्रेन बोलविण्यात आली. त्यानंतर नदीच्या पात्रात पडलेली बस तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर काठावर आणण्यात आली.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°55'47"N   76°40'49"E
  •  325 किमी.
  •  403 किमी.
  •  404 किमी.
  •  413 किमी.
  •  433 किमी.
  •  746 किमी.
  •  861 किमी.
  •  951 किमी.
  •  1033 किमी.
  •  1069 किमी.
This article was last modified 12 वर्षांपूर्वी