गोदावरी नदीवर बांधल्या जाणा-या बाभळी बंधा-यावरून निर्माण झालेल्या वादप्रकरणी धर्माबाद येथील १३ कार्यकर्त्यांना अटक

India / Maharashtra / Dharmabad /
 Upload a photo

गोदावरी नदीवर बांधल्या जाणा-या बाभळी बंधा-यावरून निर्माण झालेल्या वादप्रकरणी धर्माबाद येथील १३ कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट जारी झाले आहे. आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांचा निषेध केल्याप्रकरणी या १३ जणांवर गुन्हे दाखल झाले होते.

बाभळी बंधाऱ्याबाबत कोर्टात चाललेल्या प्रकरणाचा निकाल लवकरच लागणे अपेक्षित असल्याने , निकालानंतर काही गोंधळ होऊ नये म्हणून नांदेड जिल्ह्यात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून या १३ जणांच्या अटकेची वॉरंट निघाली आहेत. त्यापैकी दोघांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून , अन्य ११ जणांना मात्र अटक होणार असल्याची माहिती धर्माबाद पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान , बंधारा परिसरात जमावबंदी लागू केल्याची घोषणा कलेक्टर धीरजकुमार यांनी केली आहे. जिल्ह्यातील महाराष्ट्र-आंध्र प्रदेश सीमेलहतचा प्रदेश १० ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र राहील.

बाभळी बंधाऱ्याबाबत महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये चाललेल्या वाद सध्या कोर्टात प्रलंबित आहे. याचा निकाल लवकरच लागणे अपेक्षित असल्याने अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिस दक्षता घेऊ लागले आहेत.

बाभळी बंधाऱ्याचे बांधकाम बंद करावे , या मागणीसाठी जुलै २०१० मध्ये नायडू यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी सीमेवर गोंधळ घातला. कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर चार-पाच दिवस आंध्रातील नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सरकारचा निषेध करून पुतळा दहन केले होते.

महाराष्ट्रातील बाभळी बंधारा कृती समितीने नायडू यांचा तीव्र निषेध केला. काही कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी धर्माबाद पोलिसांनी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशनगावकर , सचिव डॉ. बालाजी कोंपलवार , सहसचिव जी. पी. मिसाळे , उत्तम पिराजी सोनटक्के , संजय संभाजी जुळणीकर , राजेश संभाजी चंद्रे , राजारेड्डी रामलू गडमोड , गंगाधर गंगाराम यडपलवार , सुरेश सायबू घाळे , दीपक अरुण पत्रे , बालराज राजय्या उपेलवार , शे. जमीर शे. लासनसाब , रामचंद्र रेड्डी , सायन्ना सामोड येताळा यांना अटक करून गुन्हा दाखल केला होता.

चंद्राबाबूंवरील गुन्हे मात्र रद्द

कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणल्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे राज्याच्या गृहखात्याने मागे घेतले. मात्र , बंधारा कृती समितीच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे तर घेतले नाहीत व महाराष्ट्राच्या भूमीपुत्रावरील गुन्हे मागे घेतले नसल्याने कार्यकर्त्यांनी गृहखात्यावर संताप व्यक्त केला आहे. गुन्हा मागे नाही घेतल्यास कृती समितीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°51'11"N   77°49'14"E
  •  145 किमी.
  •  432 किमी.
  •  453 किमी.
  •  511 किमी.
  •  597 किमी.
  •  629 किमी.
  •  733 किमी.
  •  792 किमी.
  •  862 किमी.
  •  921 किमी.
This article was last modified 12 वर्षांपूर्वी