गांधीतीर्थ.

India / Maharashtra / Jalgaon /
 विद्यापीठ  गट निवडा

गांधीतीर्थचा परिसरच विलक्षण आहे. एका टेकडीवजा भागांत विविध प्रकारच्या झाडांनी, वेलींनी बहरलेला परिसर. आंबा, गुलमोहर, कडुनिंब, विविध रंगांचे बोगनवेल व आणखी बऱ्याच प्रकारचे वृक्ष या ठिकाणी डोलताना दिसतात. (कै.) भवरलाल जैन यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेला आंतरराष्ट्रीय उद्योग समूह येथे बघावयास मिळतो. फळांवर प्रक्रिया करणे, कांदा निर्जलीकरण, केळीच्या झाडांची टिश्‍युकल्चर माध्यमातून रोपे तयार करणे, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन, शेतीची अवजारे बनविणे, बायोगॅस निर्मिती, ठिबक सिंचन, झाडांसाठी खत बनविणे अशा विविध विषयांचे ज्ञान व प्रात्यक्षिक बघायला मिळाले. सर्व प्रकल्पांच्या ठिकाणी छोटी-छोटी पण अर्थपूर्ण वाक्‍ये दिसतात, जसे की - "छोटे छोटे कदम, आसमॉं छूने का दम', "किसान की मुस्कान हमारा लक्ष्य', "आमरस खिलाओ, खुशीया मनाओ'. इंग्रजीतील एक वाक्‍य मला खूपच आवडले - "Our small ideas like the little drops of water, that make mighty ocean Make Big Revolutions'. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येथील गांधीतीर्थ. महात्मा गांधींचा जीवनप्रवास माहिती, चित्रपट, चित्र व पुतळे यांच्या माध्यमातून उलगडून दाखवणारे अद्ययावत वातानुकूलित म्युझियम येथे आहे. म्युझियम बघितल्यावर एक जिवंत इतिहास डोळ्यांपुढे तरळतो. महत्त्वाचे म्हणजे येथे अभ्यासिका आहे. गांधीजींसंदर्भात आणि त्यांना आवडणाऱ्या विषयातील अनेक मोलाचे ग्रंथ येथे आहेत. एखाद्या अभ्यासकाला त्याच्या आवडीच्या कोणत्याही विषयावर अभ्यास करायचे असेल, तर येथे अभ्यासकांसाठी आरामदायी खोल्याही आहेत. अभ्यासकांनी यावे व येथे निवांत अभ्यास करीत बसावे, अशी गांधीतीर्थची उभारणी करणाऱ्यांची इच्छा आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°56'39"N   75°33'18"E
This article was last modified 7 वर्षांपूर्वी