‘चितळे बंधू मिठाईवाले, शनिपार (पुणे)

India / Maharashtra / Pune / पुणे
 दुकान  गट निवडा

दूध-खवा-चक्का या गोष्टींना पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद पाहता मोठी मागणी पूर्ण करायची असेल तर स्वतंत्र दुकान हवे हे ओळखून भाऊसाहेबांनी १९५० मध्ये शनिपार येथे आणि चारच वर्षांनी डेक्कन जिमखान्यावर ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची स्थापना केली. यातील बंधू या शब्दाला महत्त्व आहे. गेली ६५ वर्षे चितळे बंधू हा व्यवसाय बघत आहेत. दुधाच्या घरगुती व्यवसायाचे मोठय़ा व्यवसायामध्ये रुपांतर करण्यामध्ये रघुनाथरावांचे योगदान आहे. पुण्यामध्ये तीन लाख लिटर म्हशीच्या आणि एक लाख लिटर गाईच्या दुधाच्या पिशव्या विकल्या जातात. त्याचप्रमाणे पाच हजार लिटर सुटं दूध विकले जाते. राजाभाऊ चितळे यांनी त्यांना पूर्ण सहकार्य देत पुण्यातील दूधविक्री, मिठाईचा व्यवसाय सांभाळला. ‘चितळे बंधू मिठाईवाले’ हा बॅँड्र जगभर पोहोचविण्यामध्ये रघुनाथराव आणि राजाभाऊ यांची मेहनत, कल्पकता आणि चिकाटी दिसून येते. बाकरवडी या नावीन्यपूर्ण उत्पादनाचे जनक असलेल्या रघुनाथरावांनी बाकरवडी सातासमुद्रापार जाण्यासाठी परिश्रम घेतले. चितळे कुटुंबाचे आधारवड असलेल्या भाऊसाहेबांनी सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवले होते. शनिपार आणि डेक्कन जिमखाना येथील दोन दुकाने, शिवापूरजवळील रांजेगाव, गुलटेकडी आणि पर्वती इंडस्ट्रीयल इस्टेट येथे मिळून पाच कारखाने आणि चितळे उत्पादन विक्रीची १२ दुकाने (फ्रँचायजी) अशी चितळे बंधूच्या व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यामध्ये त्यांनी योगदान दिले. पत्नी विजया यांच्यासमवेत सात दशकांचा संसार यशस्वी केला. बंधू राजाभाऊ आणि विजया चितळे यांच्या निधनाचे दु:ख पचवून ते अखेपर्यंत नियमितपणे शनिपार येथील दुकानामध्ये येत असत. कोणत्याही पदार्थाची चव स्वत: खाऊन पाहिल्यानंतरच त्याची विक्री करण्याचा दंडक त्यांनी घालून दिला. उद्योगाबरोबरच शिक्षण प्रसारक मंडळी या शिक्षण संस्थेमध्ये भाऊसाहेबांनी ४० वर्षे काम केले. त्यांच्या कल्पक दृष्टीनेच संस्थेने शिक्षण क्षेत्रात केवळ नावलौकिकच संपादन केला असे नाही, तर संस्थेचा विस्तारही मोठय़ा प्रमाणावर झाला. जोशी हॉस्पिटलला त्यांनी एक कोटी रुपयांची देणगी दिली. चित्पावन संघ, पुणे हार्ट ब्रिगेड, मिठाई-फरसाण आणि दुग्धव्यवसाय संघ या संस्थांचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी या संस्थांनाही लौकिक प्राप्त करून दिला. सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेताना भाऊसाहेबांनी चिपळूण येथील िवध्यवासिनी देवस्थानचा जीर्णोद्धार आणि अंबाजोगाई येथे भक्तनिवास उभारण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°30'48"N   73°51'12"E
  •  15 किमी.
  •  119 किमी.
  •  173 किमी.
  •  328 किमी.
  •  474 किमी.
  •  573 किमी.
  •  700 किमी.
  •  742 किमी.
  •  820 किमी.
  •  877 किमी.
This article was last modified 9 वर्षांपूर्वी