गणपती मंदिर (हेलस)

India / Maharashtra / Selu / हेलस
 मंदीर, गणेश / गणपती मंदिर
 Upload a photo

गावाच्या पंचक्रोशीचे आराध्यदैवत असलेली, साधारणपणे तीन फूट उंचीची स्वयंभू गणेशाची मूर्ती मनमोहक व आकर्षक आहे. एरव्ही महाराष्ट्रात घरोघरी सामान्यतः गणेशोत्सवाची सुरुवात गणेश चतुर्थीला घरोघरी श्रींच्या मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून केली जाते, व अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तीच्या विसर्जनाने उत्सवाची सांगता होते. मात्र हेलस येथे राहणाऱ्या नागरिकांपैकी कुणाच्याच घरी गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जात नाही. ग्रामदैवत गणपती मंदिरातील गणेशाची मूर्ती हे दैवत मानून उत्सवाची सुरुवात भाद्रपद शुद्ध नवमीला मंदिरात भागवत सप्ताहाने होते व उत्सवाची सांगता भाद्रपद पौर्णिमेला गावातून श्रींची पालखी मिरवणूक काढून केली जाते. असा हा स्थापना व विसर्जनाशिवाय साजरा होणारा हेलसचा आगळावेगळा सार्वजनिक गणेशोत्सव.भाद्रपद पौर्णिमाही महत्वाची आहे. या गणेशोत्सवाचा आकर्षणाचा हा दिवस आहे. या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी, गावातून लग्न होऊन गेलेल्या व आज हयात असणाऱ्या सर्व माहेवाशीण महिला कितीही व्याप असले, तरी न विसरता मागील १२६ वर्षांपासून आपापल्या तीन पिढयांसोबत माहेरी येतात. त्यामुळे या दिवसाला दसरा, दिवाळीपेक्षही जास्त महत्व दिले जाते. या दिवशी सकाळी मंदिरात पूजाविधी केला जातो. दुपारी ग्रंथाची मिरवणूक व खास शिरा, भात व कढीचा महाप्रसाद होतो. संध्याकाळी हरिपाठानंतर रात्री नऊ वाजता मंदिरातून पालखीद्वारे श्रींची मिरवणूक काढली जाते. यात जवळपासच्या परिसरातील ३० ते ४० गावांतील दिंडीपथके सामील होतात. गावातील चोररस्त्यावरून पालखी जमिनीवर खाली न ठेवता रात्रभर मिरवणूक काढली जाते व सकाळी पालखीचे मंदिरात विसर्जन केले जाते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°38'5"N   76°25'13"E
This article was last modified 11 वर्षांपूर्वी