नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय,N H College Main Building (Brahmapuri)

India / Maharashtra / Brahmapuri
 Upload a photo

स्नेहल जेवताना फक्त बातम्या पहायची!
विदर्भातून सर्वाधिक गुण घेणारी स्नेहल येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी असून, तिचे संपूर्ण कुटुंबच गुणवंतांचे आहे. जेवताना केवळ बातम्या पाहणे यापलिकडे तिने या वर्षभरात टीव्हीच पाहिला नाही. बारावीच्या परीक्षेत विदर्भातून प्रथम येण्याचा मान मिळविल्यानंतर स्नेहलस्च्या ब्रम्हपुरीच्या आनंदनगर येथील घरी जाऊन तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी तिने तभाशी दिलखुलास संवाद साधताना आपल्याला डॉक्टर व्हायचे असल्याचे बोलून दाखविले. वडील
ईश्वर कोसे हे शिक्षक असून आई तनुजा गृहिणी आहे. काका शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे डॉक्टर आहेत. तिने सांगितले की, अभ्यास करीत असता नियमित वेळापत्रक तयार केले होते. इंग्रजी आणि पाली विषय सोडून इतर विषयांची शिकवणी लावली होती. अभ्यासाचा डोक्यावर खूप ताण घेतला नाही. नियमित अभ्यास केला. अभ्यासामध्ये येणारया अडचणी शिक्षकांशी चर्चा करून सोडविल्या. वडील शिक्षक असल्यामुळे त्यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याची माहितीही तिने यावेळी दिली. बारावीचे वर्ष असल्यामुळे टीव्हीवरील बातम्या बघायची. चित्रकलेची आवड असून मैत्रिणींसोबत अनेक विषयांची चर्चा केली होती. अभ्यासात प्रा. जयंत खरवडे, प्रा. विजय मुडे, प्रा. कुच्चनवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. स्नेहलने आपल्या यशाचे श्रेय पालक, शिक्षक आणि मैत्रिणींना दिले आहे.
Nearby cities:
Coordinates:   20°37'11"N   79°51'21"E
  •  119 km
  •  207 km
  •  249 km
  •  286 km
  •  435 km
  •  442 km
  •  455 km
  •  474 km
  •  614 km
  •  822 km
This article was last modified 12 years ago