लिंगाणा

India / Maharashtra / Mahad /
 तटबंदी  गट निवडा

समोर स्वप्नवत लिंगाणा उभा ठाकला होता. अगदी भोले शंकराच्या पिंडीसारखा वाटणारा! पूर्वरंगात त्याचं रुप शेलुटी (फोटोग्राफीतला शब्द) वर्गात मोडणार होतं. सूर्याजीराव तापण्याच्या आत बराच मोठा पल्ला गाठावा अशी ताकीदच कॅप्टन हिरा सरांनी दिलेली असल्याने पावलं भराभरा चालू लागली. दोन तासांच्या वेगवान चालीनंतर लिंगाणा माचीवर येऊन पोहोचलो. लिंगाणा आम्हाला आव्हान देत होता. इतक्या वर्षात अनेक बुलंद गडकिल्ल्यांना आणि डोंगरांना भिडलो असल्याने तोच उत्साह भरून आला. तासाभरात लिंगाणाच्या पश्चिम पोटावरील गुहेत जेवण उरकून घ्यायचं ठरलं. गुहेच्या छत्रछायेत दुपारच जेवण आटोपलं. समोर पानेगाव व परिसर लख्ख प्रकाशात उजळून निघालेला होता.लहान मोठे टप्पे पार करत तासाभरात बरीच मजल मारलेली होती. एका धारेवर विश्रांती थांबा ठरवला. नजर दूरवर खिळली. पूर्वेला बोराट्याची, सिंगापूर नाळ व इतर कुटुंबकबिला अगदी भव्य दिव्य दिसू लागले. पुन्हा एकेरी वाट सुरू झाली. शेवटचे दोन कठीण टप्पे पार करत माथा गाठला आणि आनंदाला पारावार उरला नाही. जणू एव्हरेस्ट सर केल्याच्या भावना मनी दाटून आली.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°15'8"N   73°30'10"E
  •  46 किमी.
  •  117 किमी.
  •  203 किमी.
  •  345 किमी.
  •  506 किमी.
  •  564 किमी.
  •  697 किमी.
  •  731 किमी.
  •  802 किमी.
  •  873 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी