किल्ले वाफगाव ता.खेड जि.पूणे (महाराष्ट्र) (Vafgaon)

India / Maharashtra / Rajgurunagar / Vafgaon
 तटबंदी  गट निवडा

होळकरांच्या वोइभवशलि इतिहासाचे उदाहरण म्हणजे वाफगावचा भुईकोट किल्ला होय. हा भुईकोट किल्ला रयत शिक्षण संस्थेला बक्षीस रुपात दिला आहे .राजगुरुनगर पासून १२ k.m अंतरावर वाफगाव आहे.तेथे जाण्यासाठी एस .टी बस ची सुविधा आहे.वाफगावच्या प्रमुख ठिकाणी उतरल्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वोभव स्मृती असे लिहिलेली वेस नजरेस पडते .तेथून काहीच अंतरावर किल्ला आहे .किल्ल्याच्या प्रमुख प्रवेश द्वरावर शिक्षण संस्थेचे नाव लिहिलेले दिसते (महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय वाफगाव ).दाराच्या भीतीबुरुज या मजबुत दगडात असून दरांवर लोखंडी सुळे आहेत .किल्ल्याच्या आत राजदरबार ,राजमहाल ,अंधारी विहीर ,होळकर कालीन तोफा ,काही मंदिरे (विष्णू -लक्ष्मि ,विष्णू पंच्याती ,मांगीर बुवा),बावडी ,राजमहालाची तटबंदी,होळकर कालीन भव्य गुफा तसेच किल्ल्याच्या बाहेरील असलेले राजेश्वराचे मंदिर पाहण्यासारखे आहे.हा किल्ला शाळेला दिल्यामुळे या किल्ल्यावर रयत शिक्षण संस्था वाफगाव याचे नियंत्रण असून आतील असलेल्या गुफा मुजवण्यात आलेल्या असून बाजूचे दार व राजदरबाराचे आतील द्वार हे सिमेंटने कायमचे बंद केलेले आहे .हे पाहून इतिहास प्रेमीना जरूर दुख होते .राजदरबाराचा आतून काही भाग पडला असून राजमहाल हा दुमजली असून मजबूत स्थित आहे.राजमहालाच्या आत होळकर कालीन सुबक लाकडी काम पाहवयास मिळते .या महालाला राणीचा महाल म्हणून ओळखला जातो . राजेश्वराचे मंदिर पाहिल्यावर आपणास होळकर कालीन रेखीव व सुरेख दगडी कामाचा बोध होतो .या मंदिरच्या नक्षीदार बांधकामात महेश्वर किल्ल्याची समरूपता पाहवयास मिळते .हा किल्ला महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचे जन्मस्थान आहे.या किल्ल्याचे बांधकाम हे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या राज्यकाळामध्ये सुरु होऊन राणी अहिल्यादेवी यांच्या राज्यकाळात पूर्ण झाले असे म्हटले जाते (सदया पुरावा उपलब्ध नाही).होळकर प्रेमीनी हा किल्ला जरूर एकदा पहावा .

अधिक फोटो पाहण्यासाठी Click करा
www.facebook.com/media/set/?set=a.466605050049357.10259...

To Join( Like ) Page होळकर राजघराण www.facebook.com/HolakaraRajagharana
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°52'41"N   73°59'28"E
  •  41 किमी.
  •  112 किमी.
  •  135 किमी.
  •  297 किमी.
  •  470 किमी.
  •  560 किमी.
  •  727 किमी.
  •  774 किमी.
  •  856 किमी.
  •  905 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी