Wikimapia is a multilingual open-content collaborative map, where anyone can create place tags and share their knowledge.

Rajwada (इंदोर)

India / Madhya Pradesh / Indore / इंदोर / RAJWADA
 महाल, ऐतिहासिक, बाजार, पुरातत्वविषयक जागा, public garden (en), historic town square (en)

इंदौर संस्थानाच्या खजिन्यातले मौल्यवान जडजवाहर होळकर घराण्याच्या सध्याच्या वारसांकडे न राहण्याची तीन कारणे झाली. महाराजा तुकोजीराव होळकर एका खुनाच्या संदर्भात गोवले गेल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना पदच्युत केले. त्यानंतर तुकोजीराव कायमसाठी फ्रान्समध्ये स्थायिक झाले. जाताना त्यांनी आपल्याबरोबर इंदौर पिअर्स, पोर्टर ऱ्होड्स, स्पॅनिश इक्विझिशन वगरे अनेक जवाहर आणि सोन्याचे दागिने नेले. (यापैकी 'इंदौर पिअर्स' ही हिऱ्यांची जोडी १९८७ साली 'ख्रिस्टीज' या लिलाव संस्थेने विकली, त्या वेळी २७ लाख डॉलर ही किंमत त्यासाठी मिळाली होती).
दुसरे कारण म्हणजे १९९० साली इंदौरच्या शिवविलास पॅलेसमधील चोरी! राणी शर्मिष्ठाबाईंच्या तिजोरीतून हिऱ्या-मोत्यांचे अनेक संग्रह चोरीला गेले.
तिसरे कारण म्हणजे १९६१ साली महाराणी उषादेवींना भरावा लागलेला १.१४ कोटी रुपयांचा मालमत्ता कर. होळकरांनी आपल्या मालमत्ता करभरणीचे नियोजन नीट केले नव्हते. अखेरीस उषादेवींनी जागतिक लिलावांद्वारे अनेक जडजवाहर विकून कराचा भरणा केला. शिवविलास पॅलेसमधील चोरीस गेलेले अनेक दागिने आणि मौल्यवान वस्तू पुरातन सामान विक्रेत्यांकडे सापडले. सापडलेल्या वस्तू कोर्टाच्या ताब्यात असल्याने होळकर वारसांना मिळालेल्या नाहीत. १९४७ साली भारत सरकारने महाराजा यशवंतराव होळकरांकडे त्यांच्याकडे असलेल्या पिढीजात मालमत्तेचा तपशील मागितला होता. त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या तपशिलातील सर्व मालमत्ता होळकर घराण्याची असल्याचे सरकारने जाहीर केले. होळकरांच्या अलीकडच्या पिढीतील प्रिन्स रिचर्ड होळकर (छायाचित्र पाहा) यांनी ज्वेलरी डिझायिनगचे शिक्षण घेऊन अनेक वष्रे जवाहिऱ्याचा व्यवसाय केला.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   22°43'6"N   75°51'17"E
  •  20 किमी.
  •  159 किमी.
  •  281 किमी.
  •  281 किमी.
  •  286 किमी.
  •  312 किमी.
  •  411 किमी.
  •  437 किमी.
  •  461 किमी.
  •  481 किमी.
Array
This article was last modified 10 वर्षांपूर्वी