श्री नवलाई मंदिर पोसरे ..!! ........POSARE MANDIR

India / Maharashtra / Chiplun / श्री नवलाई मंदिर पोसरे
 मंदीर  गट निवडा

...............



ii श्री खेम वाघजाई - नवलाई प्रसन्न ii

श्री नवलाई मंदिर पोसरे ..!!


SHREE NAVLAI- WAGHJAI MANDIR POSARE


श्री नवलाई देवी ही पोसरे गावाची ग्रामदेवता आहे . सदर मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे . पोसरे " दुडे वाडीच्या माळावर हे मंदिर स्थित आहे . मंदिरातील मुर्त्या अत्यंत रेखीव आणि सुरेख आहेत . गाभार्यामध्ये श्री देव खेम , श्री वाघजाई देवी , श्री देव लाखोबा , तसेच ग्रामदेवता श्री नवलाई देवी इत्यादी देवतांच्या सुंदर मुर्त्या आहेत . त्याच प्रमाणे एक शिवलिंग ही आहे .


या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, याठिकाणी भाविकांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी " पाषाणाला कौल लावून " देवीकडे न्याय मागितला जातो .


या ठिकाणी दरवर्षी शिमगा संपल्यानंतर .. श्री नवलाई देवीची जत्रा भरते ..
त्याच प्रमाणे दोणवली गावाची श्री नवलाई ही पोसरे गावाच्या देवीची बहिण आहे असे येथील स्थानिक सांगतात तदनुरूप जत्रेच्या वेळी .. सहाणेवरील श्री नवलाई देवीच्या गादीवर बसण्याचा मान " दोणवलीच्या नवलाई " देवीचा असतो .

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::;



सौजन्य : सनी पवार
मु. पो. दोणवली ( पवारवाडी )
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   17°32'3"N   73°24'29"E
  •  123 किमी.
  •  189 किमी.
  •  283 किमी.
  •  422 किमी.
  •  512 किमी.
  •  615 किमी.
  •  642 किमी.
  •  666 किमी.
  •  730 किमी.
  •  815 किमी.
This article was last modified 13 वर्षांपूर्वी