बिवली गावचा लक्ष्मीकेशव.
India /
Maharashtra /
Chiplun /
World
/ India
/ Maharashtra
/ Chiplun
जग / भारत / महाराष्ट्र / रत्नागिरी
मंदीर
गट निवडा
एक अत्यंत देखणे आणि अपरिचित शिल्प म्हणजे चिपळूणजवळच्या बिवली गावचा लक्ष्मीकेशव.
कोकणात विष्णुमूर्तीचे प्राबल्य मोठय़ा प्रमाणात दिसते. त्यातही केशव आणि लक्ष्मीकेशव यांची अनेक देवस्थाने आढळतील. इतक्या विपुल प्रमाणात केशवाच्या मूर्ती या प्रदेशात विखुरलेल्या आहेत. विष्णुमूर्तीच्या हातातील आयुधक्रम हा पद्म-शंख-चक्र-गदा असा असल्यामुळे या मूर्ती केशवमूर्ती या प्रकारात मोडतात. चिपळूण करंबवणेमाग्रे बिवलीपर्यंतचे अंतर हे अंदाजे २५ किलोमीटर आहे. पेशवाईतील कर्तबगार न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्यानंतर नीळकंठशास्त्री थत्ते हे मराठी राज्याचे न्यायमूर्ती झाले. हे नीलकंठशास्त्री या बिवली गावचे होत. परकीय मूर्तिभंजकांपासून वाचवण्यासाठी अनेक सुंदर मूर्ती त्याकाळी विहिरीत, कुंडात, डोहात टाकून दिल्या जायच्या. किंवा कधीकधी जमिनीत लपवून ठेवून वाचवल्या जायच्या. अशीच एक मूर्ती नीलकंठशास्त्री थत्ते यांना सापडली आणि त्यांनी ती मूर्ती बिवली या आपल्या गावी वसवली. या मंदिराचा जीर्णोद्धार १८३० मध्ये करण्यात आला. इ.स.च्या ११-१२व्या शतकात या ठिकाणी शिलाहार राजांची राजवट होती. त्या काळातली अतिशय सुंदर कोरीवकाम केलेली आणि प्रभावळीत परिवार देवता असलेली ही विष्णुमूर्ती निव्वळ देखणी आहे. विष्णूच्या डाव्या हातातील कमळाचा देठ आणि त्याच्या पाकळ्या यांची रचना इतकी वैशिष्टय़पूर्ण आहे की, एका बाजूने पाहिल्यास ते कमळ नसून कोणा स्त्रीची मूर्ती वाटते. स्थानिक लोक त्यालाच लक्ष्मी असे संबोधतात. त्यामुळे हा देव झाला लक्ष्मीकेशव. देवाच्या डाव्या पायाजवळ श्रीदेवी असून उजव्या पायाशी नमस्कार मुद्रेत गरुड बसलेला आहे. त्यांच्या बाजूला चवरीधारी सेविका कोरलेल्या आहेत. देवाच्या अंगावरील दागदागिने अत्यंत नाजूक आणि कलात्मक आहेत. देवाची बोटे अत्यंत सुबक असून सर्व बोटांमध्ये अंगठय़ा दिसतात. डोक्यावर शोभिवंत करंड मुकुट असून समृद्धीचे प्रतीक असलेला त्रिवलयांकित गळा शोभून दिसतो. गळ्यात असलेल्या तीन माळांपैकी एका माळेतील पदकात आंबे कोरलेले आहेत. यावरून अभ्यासक असे सांगतात की ही मूर्ती स्थानिक मूर्तिकारानेच घडवलेली आहे. अनेक दागिन्यांनी मढवलेली ही विष्णुमूर्ती निव्वळ देखणी आणि अप्रतिम आहे. शांतरम्य अशा ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे.

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 17°33'34"N 73°24'58"E
- RADHA KRISHNA MANDIR 1.9 किमी.
- Datta Mandir-Jawarat Wadi 2.9 किमी.
- Vaghjai Mandir, Gangrai 2.9 किमी.
- पवारांची रहाटी ( देवाचे स्थळ)...!! (जय श्री भैरी भवानी...!!!) ......... PAWAR'S RAHATI (GOD'S PLACE)....!1 3.9 किमी.
- small hanuman temple on small hill [updated BY VINAYAK (vinayakdgr8gmail.com)] 9 किमी.
- Ganesh Mandir 15 किमी.
- ग्रामदैवत मंदिर(चंडिका देवी प्रसन्न) 15 किमी.
- paleshwar mandir (Pali) 17 किमी.
- Shri RAM MANDIR Aare 25 किमी.
- Sawat Bawa Mandir 25 किमी.
- dhanshri 2.6 किमी.
- दोणवली गावाची सीमा ( हद्द ) .. Donavali Border ...........! 2.9 किमी.
- NITESH SHIRKE'S HOUSE 3.3 किमी.
- shaikhnag property 3.4 किमी.
- काजु - वाकण...!!! Kaaju Wakan Near Poasare - Sundarwadi..!! 4 किमी.
- Pedamkar & Sun House 4.2 किमी.
- adavde wadi {posare} 4.3 किमी.
- चिपळूण तालुका 19 किमी.
- खेड तालुका 21 किमी.
- गुहागर तालुका 22 किमी.