माँ उमिया धाम मंदिर (नागपूर)
India /
Maharashtra /
Kamthi /
नागपूर
World
/ India
/ Maharashtra
/ Kamthi
जग / भारत / महाराष्ट्र / नागपूर
मंदीर
गट निवडा

भंडारा रोडवरील कापसी येथे माँ उमिया औद्योगिक वसाहतीत माँ उमिया धाम उभारण्यात आले आहे. येत्या २५ एप्रिलपासून मंदिरात प्राणप्रतिष्ठा महोत्सव होणार आहे.मंदिराचा शिलान्यास समुद्रसपाटीपासून २१ फूट खाली आहे. मंदिराची उंची १०१ फूट असून बांधकामासाठी राजस्थानमधील बंसी पर्वतातील लाल व गुलाबी दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिराचा परिसर २०० बाय १०० फूट आकारात आहे. मंदिरावर तीन कळस आहेत. २५ ते २८ एप्रिलपर्यंत प्राणप्रतिष्ठा महोत्सव चालेल. २५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजतापासून धार्मिक विधी सुरू होतील. महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते दुपारी ३ वाजता संत संमेलनाचे उद्घाटन होईल. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल प्रमुख पाहुणे राहतील, अशी माहिती जिवराज पटेल व दिनेश पटेल यांनी दिली.दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता देवांचे पूजन होणार आहे. दुपारी ३ वाजता गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहन कुडारीया यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. २७ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रम होतील. पाटीदार समाजाचे अध्यक्ष गंगाराम पटेल व उमिया संस्थान ऊंझाचे अध्यक्ष नारायण पटेल प्रमुख पाहुणे राहतील. २८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता शोभायात्रा व प्राणप्रतिष्ठा समारोह होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या उपस्थितीत दुपारी ३ वाजता समारोप होईल. रात्री ८ वाजता रासगरबा होणार आहे, अशी माहिती जिवराज पटेल यांनी दिली.एक हजार भाविकांच्या निवासासाठी वातानुकूलित भव्य भक्त निवास उभारण्यात आले आहे. भक्तांच्या प्राथमिक उपचाराची सोय करण्यात आली आहे. मोठ्या कार्यक्रमांसाठी ३ हजार क्षमतेचे सभागृह व ४० हजार चौरस फूट लॉन आहे. वृक्षराजीने संपूर्ण परिसर सजवण्यात आला आहे. मुलांच्या मनोरंजनासाठी उद्यान आहे. नौकाविहाराचा आनंद लुटण्यासाठी शेजारीच १५ एकर परिसरात सरोवर असल्याचे दिनेश पटेल यांनी सांगितले. यावेळी बाबूभाई जबवाणी, शंकर हलपाणी, मोहन दिवानी, रसिकलाल चोपरा, घनश्याम मेहता आणि जितेंद्र पद्माणी उपस्थित होते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 21°7'51"N 79°11'39"E
- ड्रॅगन पॅलेस टेम्पल 8.7 किमी.
- Hanuman Mandir , Gurukunj Nagar 10 किमी.
- टेकडी श्री गणेश मंदिर 11 किमी.
- पोद्दारेश्वर राममंदिर 11 किमी.
- गोरक्षण सभेचा परिसर 12 किमी.
- शिव मंदिर 13 किमी.
- दीक्षा भूमी 13 किमी.
- Digambar Jain Mandir (Jain Temple) 14 किमी.
- गणपती मंदिर 14 किमी.
- शिव मंदिर , पेटी चुहा 28 किमी.
- परशिवनी तालुका 33 किमी.