बनेश्वर मंदिराचा आवार

India / Maharashtra / Khed /
 बगीचा  गट निवडा
 Upload a photo

पुण्याहून सहकुटुंब एका दिवसाच्या भटकंतीसाठी बनेश्वर हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. बनेश्वर मंदिराचा आवार, तिथली पाण्याची कुंड, दाट झाडी आणि हिरवाईनं नटलेला परिसर, शिवगंगा नदीचा शांत किनारा हे सगळं मोहात पाडतं. पुण्याहून सकाळी लवकर निघालात, तर दीड-एक तासातच या मंदिराजवळ तुम्ही पोहोचता. त्यासाठी पुणे-बंगळुरू हायवेवर नसरापूर फाट्यावरून उजवीकडे वळावं. तिथून आत आलात, की डावीकडे वेल्हा रोडला न वळता समोर क्षेत्र बनेश्वराची कमान दिसते, तिथूनही आत आलात, की या मंदिराच्या आवारात दाखल होता. बनेश्वराचं दर्शन घेऊन मंदिरामागचा परिसर भटकण्यासाठी बाहेर पडावं. झाडांतून रस्ता थेट शिवगंगा नदीकडे जातो. इथं काही वॉच टॉवरही उभारण्यात आले आहेत. नदीवर एक छान धबधबाही पाहाता येतो. इथं पाण्यात दंगामस्ती न करता सोबत आलेल्यांची आणि स्वतःची काळजी घ्यावी. इथली शांतता मनाला भुरळ पाडते. जेवणाचा डबा आणि पाणी सोबत न्यावं. मंदिराच्या आवारात नाश्त्याची सोय होते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°15'21"N   73°52'24"E
  •  41 किमी.
  •  140 किमी.
  •  202 किमी.
  •  356 किमी.
  •  467 किमी.
  •  593 किमी.
  •  675 किमी.
  •  715 किमी.
  •  792 किमी.
  •  852 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी