इरशाळगड
India /
Maharashtra /
Matheran /
World
/ India
/ Maharashtra
/ Matheran
जग / भारत / महाराष्ट्र /
ruins (en), तटबंदी
इरशाळगडला जाताना आम्ही ठरल्याप्रमाणे कर्जत स्टेशन गाठलं. तिथंच सकाळचा नाश्ता करून टमटम रिक्षानं चौक मार्गे पायथ्याचं गाव गाठलं. हे चौक म्हणजे इतिहासाच्या पानात अजरामर झालेल्या नेताजी पालकरांचं जन्मगाव. इथे त्यांच्या देदिप्यमान पराक्रमाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. रिक्षातून उतरल्यानंतर पावसानं आणि बाजूलाच असलेल्या मोरबे धरणाच्या जलाशयानं आमचं स्वागत केलं. सर्वांची ओळखसत्र झाल्यानंतर ट्रेक मी लीड करायचं ठरलं. रिक्षातून येतानाच मनात कुजबुज चालू होती, की पाच वर्षांपूर्वी केलेला ट्रेक, आपल्याला वाट गवसेल? पण चालायला सुरुवात केली अन् जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सोबत अनुभवी फुलाजी आणि संदेश यांची जोड होतीच. गडाच्या खालूनच डोंगराची मळलेली वाट स्पष्ट दिसत होती. या ट्रेकची मजा म्हणजे आम्ही एकूण २८ जण असूनही सगळे मस्तपैकी एकत्र गप्पा मारत गड चढत होतो. त्यामुळे एक दीड तासाचा उभा चढ चढून देखील थकवा जाणवत नव्हता. गड चढून जाताना पाऊस काहीसा रुसला होता. समोरच धुकं आणि उन यांच्याशी खेळणारा इरशाळचा सुळका विलोभनीय दिसत होता. जो तो गडाचं ते दृश्य आपल्या कॅमेरात टिपत होता. पुढे इरशाळवाडीतून वाट काढत अर्ध्या तासाच्या चढणीनंतर आपण गडाच्या मुख्य माचीवर पोहचतो. वाटेत असणारे मोठे अडचणीचे दगड आणि समोरच अजस्त्र वाटणारे कातळ सुळके आपलं स्वागत करतात.कातळाच्या डाव्या बाजूनं चालत जाताना गडाचं स्वरूप अधिकच रौद्र भासतं. हीच वाट पुढे आपल्या गडाच्या मागील बाजूस घेऊन जातं. इथून आपल्याला प्रबळगड आणि माथेरानचा डोंगर अगदी जिवाभावाचे सवंगडी वाटतात. आजूबाजूच्या डोंगररांगेतून वाहून येणाऱ्या छोट्या ओढ्यांचं रुपांतर मोठ्या जलाशयात होताना पहिलं, की मन तिथंच गुंतून राहातं.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 18°56'2"N 73°13'54"E
- प्रबळगड 5.4 किमी.
- किल्ले विकटगड 12 किमी.
- किल्ले राजमाची 20 किमी.
- सिद्धगड 40 किमी.
- किल्ले सुधागड भोराईचा डोंगर (भोरपगड) 44 किमी.
- किल्ले रायगड 80 किमी.
- किल्ले तोरणागड 83 किमी.
- किल्ले राजगड 89 किमी.
- किल्ले कमळगड 119 किमी.
- किल्ले पन्हाळा 253 किमी.
- इरशाळवाडी 0.3 किमी.
- Vijay Jadhav House 5.2 किमी.
- Harish Jadhav House 5.2 किमी.
- हॉटेल लेक व्ह्यू माथेरान 6.1 किमी.
- द ब्य्के हेरिटेज माथेरान 6.4 किमी.
- माथेरान 7.5 किमी.
- गारबेट पठार 7.7 किमी.
- खालापुर तालुका 10 किमी.
- पनवेल तालुका 13 किमी.
- कर्जत तालुका 18 किमी.