सोनई

India / Maharashtra / Rahuri /
 खेडेगाव  गट निवडा
 Upload a photo

नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यामधील सोनई गावात मेहतर समाजातील तीन तरुणांची निर्घृण हत्या झाली. राजकीयदृष्ट्या अत्यंत सजग असलेल्या या जिल्ह्यात एकाही राजकीय नेत्याला या प्रकरणात लक्ष घालावेसे वाटलेले नाही. पोलिसांनी केलेला तपास पाहता , त्यावरही विश्वास ठेवावा असे चित्र नाही ... जातिव्यवस्था नष्ट करण्याच्या लंब्याचवड्या बाता करण्यापेक्षा वर्षानुवर्षे त्या व्यवस्थेचे चटके सहन केलेल्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा सर्वांत परिणामकारक उपाय ठरेल. ' महाराष्ट्र टाइम्स ' चे माजी संपादक गोविंद तळवलकर यांनी या प्रकरणाचा घेतलेला परखड परामर्श.
एक जानेवारी रोजी नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यामधील सोनई गावात मेहतर समाजातील तीन तरुणांची राक्षसी रीतीने हत्या झाली. यासंबंधी मराठी वृत्तपत्रांत व एक-दोन वाहिन्यांवर तुरळक वृत्त दिले गेले होते. इथे अमेरिकेत माझ्या वाचनात व ऐकण्यात हे आले नाही. आता ' साधना ' च्या ताज्या अंकात या गुन्ह्याची चौकशी करणाऱ्या समितीचे एक सदस्य सुबोध मोरे यांचा लेख प्रसिद्ध झाल्यामुळे सर्व चित्र डोळ्यापुढे उभे राहिले. महाराष्ट्रास अत्यंत लाजिरवाण्या झालेल्या कृत्याचा सारा तपशील समजला. तो अंगावर शहारे आणणारा आणि संतापजनक वाटला.
सचिन घारूच्या प्रेमप्रकरणामुळे त्याची व त्याच्या दोघा सहकाऱ्यांची हत्या झालेली पाहिल्यावर सचिनच्या आईने गुन्हेगारांना ' हैवान ' म्हटले आहे व तेच योग्य वर्णन आहे.
सुबोध मोरे यांनी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे , की सचिन घारू हा मेहतर समाजातला तरुण दरंदले परिवारातल्या मुलीच्या प्रेमात पडला होता व ती दोघे विवाह करणार होती. पण त्या मराठा कुटुंबीयांना ते मान्य नव्हते. या प्रकारचा ‌विवाह मान्य नसणे हे काही अभिनव नाही. पण त्यासाठी निर्घृण रीतीने खून व्हावा आणि पोलिस यंत्रणेने यासंबंधात कमालीची अनास्था दाखवावी हे निषेधार्ह आहे.
खून करणाऱ्यांच्या क्रूरतेला काही सीमा नव्हती. मोरे लिहितात की , सचिन घारू यास कडबा कापायच्या मोठ्या अडकित्त्यावर जबरदस्तीने झोपवून काही लोकांनी सचिनचे मुंडके धडावेगळे केले. नंतर हात व पाय कापण्यात आले. मेहतरीच्या कामातील सचिनचा वीस वर्षे वयाचा सहकारी तिलक ऊर्फ राहुल कंदारे याच्या डोक्यावर वार करून त्याचाही बळी घेण्यात आला. त्याच दिवशी त्याचा वाढदिवस होता.
मारेकऱ्यांनी त्यांचे मृतदेह गावातल्या गणेशवाडीच्या पडक्या विहिरीत फेकून दिले. तिसरा साथीदार संदीप धनवार याचाही खून करण्यात आला. त्याचा मृतदेह प्रकाश विश्वनाथ दरंदलेच्या संडासाच्या टाकीत फेकला गेला. संदीप टाकीत पडून मेला असे त्याच्या नातेवाइकांना पोलिसांनी रात्री कळवले. ते आले तेव्हाही तो देह टाकीतच होता. दहशतवादी मुंडके धडावेगळे करीत असल्याचे आपण वाचतो. हे बळी घेणारे दहशतवादी पंथातले नसले , तरी त्यांचे वर्तन तसेच आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°23'28"N   74°48'43"E
  •  138 किमी.
  •  144 किमी.
  •  194 किमी.
  •  302 किमी.
  •  412 किमी.
  •  607 किमी.
  •  740 किमी.
  •  802 किमी.
  •  898 किमी.
  •  919 किमी.
This article was last modified 12 वर्षांपूर्वी