मोहर्ली प्रवेशद्वार

India / Maharashtra / Durgapur /

मिनी बसचे बुकिंग मोहर्ली प्रवेशद्वारावरच केले जाणार आहे.
ताडोबा व्यवस्थापनाने या प्रकल्पात माफक दरात ' मिनी बस ' सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2013 किंवा जानेवारी 2014 महिन्यात ही सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत.सवलतीच्या दरातील या सफारीचे दर प्रतिव्यक्ती १७५ रुपयांपासून तर २१५ रुपयांपर्यंत ठेवण्याचा प्रस्ताव आहे. पर्यटनासाठी नवी मिनी बस खरेदी करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ही खरेदी ' ताडोबा-अंधारी टायगर कन्झर्व्हेशन फाउंडेशन ' च्यावतीने करण्यात येणार आहे. त्यांच्याचद्वारे ही सेवा दिली जाणार. याचे आरक्षण ऑनलाइन वा आगावू करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण ताडोब्यातील सूत्रांनी दिले. मिनी बसचे. बसची आसनक्षमता १५ ते २२ इतकी राहू शकते. ' ना नफा , ना तोटा ' या आधारावर ही सेवा दिली जाणार आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°11'31"N   79°20'5"E
This article was last modified 11 वर्षांपूर्वी