वडाळा (मुंबई)
India /
Maharashtra /
Mumbai /
मुंबई
World
/ India
/ Maharashtra
/ Mumbai
जग / भारत / महाराष्ट्र / मुंबई
वस्ती, invisible (en)
मुंबईच्या पोटात वसलेलं छोटंसं पण अस्सल गाव म्हणजे वडाळा. या वडाळ्याची ओळख अनेक प्रकारची आहे. त्यातही मराठी मनात खोल रुजून बसलेली ओळख म्हणजे प्रतिपंढरपूर...
एकीकडे दादर, माटुंगा, परळ भोईवाडा तर दुसरीकडे सायन, कुर्ल्याला जोडणाऱ्या आणिक परिसराच्या कुशीत वसलेले वडाळा हे गाव. मूळ वडाळागाव पश्चिमेला असून पूर्वेचा परिसर कोरबा मिठागर किंवा अॅन्टॉप हिल. सात बेटांच्या मुंबईच्या रचनेत वडाळागाव हे भातशेती आणि फुलांच्या वाड्यांसाठी तर कोरबा मिठागर मिठाच्या शेतीसाठी प्रसिद्ध होते. दोन्हीकडचे मूळ भूमिपुत्र कोळी आणि आगरी समाजाचे. कालौघात इतर मराठी संख्या वाढली.
वडाळ्याची जुनी ओळख म्हणजे विठ्ठल मंदिर. 'प्रतिपंढरपूर' या नावानेही ते ओळखलं जातं. ही प्रक्रिया सुमारे ४०० वर्षांपूर्वी सुरू झाली. आषाढी एकादशीला वडाळ्यातील कोळी आणि आगरी समाजाची दिंडी चालत पंढरीला जात असे. या दिंडीमध्ये एक गुरू असायचे. एका वारीत ते आंघोळीसाठी चंद्रभागेत उतरले असता त्यांच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत कशी झाली हे पाहण्यासाठी इतर मंडळी पाण्यात उतरली असता चंद्रभागेच्या पाण्यात विठ्ठलमूर्ती सापडली. गुरूंच्या सांगण्यावरून त्यांनी ती मूर्ती वडाळ्याला आणून छोटेखानी मंदिर बांधले. तुकोबांच्य हस्ते सन १६१४ साली या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, असे सांगतात. आषाढी एकादशीला जत्रा भरते. किमान तीन ते चार लाख भाविक गर्दी करतात. मुंबईत भरणाऱ्या जुन्या जत्रांपैकी ही एक. फक्त एक दिवस भरणारी ही जत्रा पूर्वी रात्रभर चालायची. दहशतवादी धोक्यामुळे वीस वर्षांपासून ही जत्रा रात्री दहा वाजता पोलिस बंद करतात. या जत्रेची आता रया गेली आहे.
विठ्ठल मंदिरासोबतच वडाळ्याचे ग्रामदैवत भैरवनाथ हा येथील रहिवाशांसाठी श्रद्धेचा विषय. ग्रामदैवताच्या वार्षिक उत्सवानिमित्त निघणारी पालखी हा आनंदसोहळा. वडाळ्याच्या सीमेतून देवाची पालखी नेऊन गावावर येणारी इडा पिडा टळो असे साकडे ग्रामस्थांतर्फे घातले जाते. पालखी मार्गावर भाताची शिते टाकण्याची आणि देवाला बोकडाचा बळी देण्याची परंपरा लहान मुलांमध्ये कुतूहल निर्माण करी. ३० वर्षांपूर्वी वडाळ्यात घरात आणि रस्त्यांवर विजेचे दिवे नसल्याने कंदील, गॅसच्या बत्तीच्या उजेडात निघणारी ही पालखी गूढतेचे वलय निर्माण करत असे. पालखी आली की आया मुलांना घरात कोंडत. त्यामुळे मुलांना देवासोबत भुतं नाचतात की काय, असे वाटे. हे या गूढतेचे कारण होते. मराठी समाजासोबत ख्रिश्चन व इतर धर्मीयही या सोहळ्यात सहभागी होतात. गावात कोकणातील कुणबी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने गुडीपाडवा किंवा दिवाळीला 'नमन' मात्र हटकून व्हायचे. श्रावण सुरू झाला की 'जाखडी' नृत्याची बहार. काळाच्या ओघात हे खेळ जवळपास बंद झाले आहेत. गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे श्रीराम मंदिर तसेच अलबेला हनुमान ही जुनी मंदिरेही इथे आहेत. महानुभाव पंथाचे श्रीकृष्ण ज्ञानमंदिर हे सामान्यांपासून थोडसं दूर. सामान्यांना महानुभव पंथ, चक्रधरस्वामी यांची माहिती नसल्याने हा दुरावा. गीतेवरील रसाळ प्रवचने हे या मंदिराचे वैशिष्ट्य. गोकुळाष्टमी, चक्रधर जयंतीचा कार्यक्रम येथे साजरा होतो.
वडाळा पूर्वेला असलेले कोरबा मिठागर ही आणखी एक ओळख. या आगारात मीठखरेदी करण्यासाठी दूरवरचे व्यापारी वडाळ्याला येत. वडाळा गावात पूर्वी वडाची झाडे होती. दूरचा प्रवास करून थकलेले व्यापारी गाढवांसह झाडांखाली घटकाभर विश्रांती घेत असत. विश्रांतीस्थळ आल्याची खूण म्हणून हे व्यापारी एकमेकांना 'वड आला रे वड आला...' असे कुकारे. त्याचा अपभ्रंश 'वडाळा.' तर 'कोरबा मिठागर' नावाचा इतिहास असा आहे... या मिठागराच्या खाडीपट्ट्यात गुजरातच्या कच्छ भागातून 'कोळी-कोरबा' जमातीची 'पांडू' नावाची व्यक्ती प्रथम स्थायिक झाली. त्याची ब्रिटिशांनी राखणदार म्हणून नेमणूक केली. या व्यक्तीच्या जमातीवरून या भागाला 'कोरबा मिठागर' असे म्हटले जाते. कोरबा मिठागर किंवा अनेक वर्षांपासून या भागाला 'अॅन्टॉप हिल' नावाने ओळखले जाते. डोंगरसदृश्य चार-पाच टेकड्यांमुळे 'अॅन्टॉप हिल' हे नाव प्रसिद्ध झाले असे कार्यकर्ते शिवाजी फणसेकर सांगतात.
मिठागराच्या खाडीच्या किनारपट्टीला कोळी, आगरी समाजाची वस्ती. कोळ्यांची मासेमारीवर तर मिठाच्या शेतीवर आगरी समाजाची उपजीविका. ब्रिटिशांनी मिठावर लावलेल्या कराविरुद्ध गांधींनी १९३०मध्ये लढा उभा केला. यह दांडीयात्रेत वडाळ्यातील आगरी समाज सहभागी होता. बदलत्या जमान्यात वडाळा गावात खास बदल झाला नाही. कोरबा मिठागर मात्र ८०च्या दशकापासून बदलू लागले. १९६०पासून दलित समाजाची संख्या कोरबा मिठागरात वाढू लागली. दलित पँथरच्या झंझावातात या भागात 'छावण्या' (पँथरची शाखा) स्थापन झाल्या. पँथरचे मोर्चे, आंदोलनांनी हा भाग दणाणून जाई. नामदेव ढसाळांची भाषणे, वामनदादा कर्डक यांची गाणी, आंबेडकरी जलसा, प्रल्हाद शिंदे आणि शीलादेवी यांची रंगणारी कव्वालीने हा भाग रात्रभर दुमदुमे. वडाळा पश्चिमेला असलेले आंबेडकर कॉलेज, सिद्धार्थ हॉस्टेल हा कार्यकर्त्यांचा अड्डा. गरज भासेल तेव्हा कार्यकर्ते छावण्यांमध्ये हजर राहायचे.
१९७०च्या सुमारास खाडी आणि मिठागराच्या जमिनींवर अतिक्रमणे सुरू झाले. त्याची सुरूवात वरदराजन मुदलियारने केली. स्थानिकांत 'वरदाभाय' नावाने तो ओळखला जायचा. गणेशोत्सवातील म्युझिक लायटिंगच्या रोषणाईमुळे माटुंग्यात त्याचे प्रस्थ वाढले. तत्पूर्वी कोरबा मिठागरमध्ये तो झोपडीदादा होता. खाडी आणि मिठागरांच्या जागेवर अतिक्रमण करून झोपड्या बांधण्याचा सपाटा त्याने लावला. या झोपड्यांमध्ये अवैध धंदे करून वरदाने दहशत पसरवली. वरदाच्या आशीवार्दाने तामिळींची संख्या वाढली. खाडी, मिठागरे नामशेष झाली. वरदाच्या अवैध धंद्यांना स्थानिक लोक विरोध करायचे मात्र वरदाच्या वाटेला जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण. वरदाची वाढती दहशत ही पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली असताना वाय. सी. पवार यांची माटुंगा पोलिस स्टेशनला नेमणूक झाली. वरदाच्या साम्राजाच्या खातमा वायसींनी केला तेव्हा या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
वडाळ्याच्या दोन्ही बाजूला विशेषतः पूर्वेला १९८०नंतर उत्तर भारतीय, बिहारींनी केलेल्या अतिक्रमणाने धारावीची आठवण यावी अशी झोपडपट्टी निर्माण झाली. गुन्हेगारीचे प्रमाणही कोरबा मिठागरमध्ये वाढले. पूर्वेचा मूळचा कोळी आणि आगरी समाज आता गणेशनगर, शिवशंकरनगर या भागापुरता सीमित झाला आहे. पश्चिमेकडे आलेली मोनो रेल गावाकडून शहराकडच्या प्रवासाची नव्या युगाची आठवण करून देणारी ठरली आहे.

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 19°0'59"N 72°51'56"E
- कोरबा मिठागर 0.2 किमी.
- शिवडी खारफुटी 1.1 किमी.
- माहूलची खाडी 1.9 किमी.
- माहुल तिवराचे रान 2.5 किमी.
- Sealord Containers Limited ( An annexe to Aegis Chemicals) 2.5 किमी.
- Sai Nagar,ambapad,mahul village, 2.7 किमी.
- बी पी सी एल - मुंबई रिफायनरी 3 किमी.
- चेंबूर 3.9 किमी.
- ट्राँबे बेट 6 किमी.
- मुंबई 13 किमी.