मोरजाईच्या मंदिर,कोल्हापुर
| तटबंदी, हिंदू मंदिर
India /
Maharashtra /
Kankavli /
World
/ India
/ Maharashtra
/ Kankavli
जग / भारत / महाराष्ट्र / कोल्हापूर
तटबंदी, हिंदू मंदिर
कोल्हापुरातून बोरबेटपर्यंतचे अंतर जवळपास ६० किलोमीटर आहे.हजार एक वर्षांपूर्वीचे जुने मंदिर, नितांत सुंदर निसर्ग, पठार आणि समोर दिसणाऱ्या डोंगररांगा, दुर्मिळ वनस्पती असं सगळं एकाच ठिकाणी अनुभवयाचं असेल तर मोरजाईला जाण्याशिवाय पर्याय नाही. सह्याद्रीच्या डोंगररांगात असलेल्या देखण्या पठारांच्या सौदर्यातील सर्वोच्च बिंदू म्हणजे मोरजाई म्हणता येईल. गगनबावड्याच्या रस्त्यावर बोरबेटपासून चाळीस मिनिटे डोंगर चढून गेल्यानंतर मोरजाईचे पठार लागते. मोरजाई देवीच्या मंदिरावरून या पठाराला मोरजाईचे पठार असे नाव मिळाले आहे. कोल्हापुरातील दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके गेली २५ वर्षे या पठारवर जातात. आपल्या परिसरातील सर्वांत सुंदर परिसर म्हणजे मोरजाई असल्याचे त्यांनी सांगितले.
मोरजाईचे मंदिर हे गुहा मंदिर आहे. पठारावर असलेल्या एकमेव शिलाखंडावर हे मंदिर साकरण्यात आले आहे. कोल्हापुरात फारफार तर एक किंवा दोनच गुहा मंदिरे आहेत, त्यातील हे एक होय. अशा पद्धतीच्या मंदिर बांधण्याची शैली. इ.स. ४३० नंतर लुप्त होत गेली. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या मध्यावर या मंदिराचे बांधकाम झाले असावे, अशी माहिती अडके यांनी दिली.
या मंदिराचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वाटेवर असणाऱ्या दगडी कमानी होय. मंदिराकडे जाताना ठराविक अंतरावर दगडी कमानी लागतात. मंदिराकडे जाताना वाट चुकू नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या परिसरात अशा प्रकारची व्यवस्था कुठेही पाहायला मिळत नाही. तसेच कोकणात दिसतात तशा पध्दतीची दीपमाळही येथे आहे.हे ठिकाण उंचीवर असल्याने येथून सूर्योदय आणि सूर्यास्त अतिशय मोहक दिसतो. वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणवरून सूर्योदय आणि सूर्यास्तही पाहता येतो.साताऱ्यातील कास पठारासारखी वनस्पती संपदा येथे पाहता येते. येथील वनराईमध्ये दुर्मिळ मॉस, वेत, अर्जुन अशी वृक्षराजी आहे. या पठारावरून राधानगरी आणि गगनबावड्याचा परिसर खुलून दिसतो. पावसात हा परिसर पूर्ण धुक्याच्या दुलईत असतो. तसेच संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो. त्यामुळे पावसात मोरजाईला भेट देणे म्हणजे पर्वणीच असते. तसेच या परिसरात जळवांचे पाणी म्हणून एक पाण्याचे ठिकाण आहे. तेथे बारा महिने जळू पाहायला मिळतात. जळू हे पावसात अॅक्टीव्ह असतात, तर अन्य सिझनमध्ये सुप्तावस्थेत असतात. त्यामुळे जळवांचे पाणी हे एक आश्चर्यच मानले जाते. काय काळजी घ्याल? मोरजाईच्या मंदिरात अंधार असतो, त्यामुळे मंदिरात जाताना सोबत टॉर्च हवीच. मंदिर परिसरात सरपटणारे प्राणी मोठ्या संख्येने असतात. बोरबेटवरून मोरजाईकडे येताना पाय घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घ्यावी लागते. तसेच खाद्यपदार्थ सोबत ठेवावे लागतात. सर्वांत काळजी घ्यायची ती पर्यावरण रक्षणाची. या पठारावरील बऱ्याच वनस्पती दुर्मिळ आहेत. तसेच पठारांवरील जैवविविधता अतिशय संवदेशनशील असते. त्यामुळे प्लास्टिक आणि बाटल्या टाकणे असे प्रकार येथे करू नका. तसेच येथील मंदिर अतिशय सुंदर असल्याने त्यावर ' कॅलीग्राफी ' करण्याचा मोह दाखवून नका.
कोल्हापुरातून गगनबावड्याकडे जाताना असळज फाटा लागतो. तेथून पुढे सांगवीचा फाटा आहे. सांगवी फाट्यावरून कुंभी नदी पार करून आपण पोहचतो बोरबेटमध्ये. कुंभी नदीचा परिसर आणि बोरबेट ही देखील अतिशय सुरेख पर्यटन स्थळे आहेत. बोरबेट म्हणजे मोरजाईचा पायथा होय. बोरबेटजवळ वाहन लावून उजवीकडच्या चढणावरून मोरजाईवर जाता येते. बोरबेटच्या पायथ्यपासून मोरजाईच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी जवळपास ४० मिनिटांचा वेळ लागतो. कोल्हापुरातून बोरबेटपर्यंतचे अंतर जवळपास ६० किलोमीटर आहे.

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 16°30'49"N 73°53'27"E
- भुदरगड किल्ला 39 किमी.
- रांगणा किल्ला,( ११ व्या शतकातील ) 48 किमी.
- यशवंत गड 59 किमी.
- श्री शिवदुर्ग किल्ले सिंधुदुर्ग 70 किमी.
- पारगड किल्ला 79 किमी.
- किल्ले यशवंतगड 88 किमी.
- चित्रदुर्ग किल्ला 370 किमी.
- రాయదుర్గం కోట 374 किमी.
- चंद्रगिरीचा किल्ला 466 किमी.
- मधुगिरी किल्ला 477 किमी.
- saitavadwe wadi 5.2 किमी.
- ramling mandir palsambe 7.3 किमी.
- दाजीपूर-राधानगरी अभयारण्य 7.5 किमी.
- babu kolekar property 8.8 किमी.
- गगनबावडा तालुका 10 किमी.
- वैभववाडी तालुका 14 किमी.
- राधानगरी तालुका 15 किमी.
- कणकवली तालुका 20 किमी.
- पन्हाळा तालुका 31 किमी.
- राजापुर तालुका 36 किमी.