YEMAI MATA MANDIR, KAWATHE

India / Maharashtra / Sirur /
 Upload a photo

कवठे येमाई (ता. शिरूर ) येथील श्री येमाई देवी पुण्यापासून ७० तर शिरूरपासून २७ किमी तर कवठे येमाई गावापासून तीन किमी अंतरावर हे मंदिर आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, आराध्यदैवत, कुलदैवत असणारे शिरुर (जिल्हा पुणे) तालुक्यातील शिरुर-मंचर रोड वर कवठे गावच्या दक्षिणेस असणारे श्री येमाई देवी देवस्थान एक जागृत देवस्थान असून, या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची मनातली इच्छा पुर्ण होत असल्याने भक्तगणांची नवस फेडण्यासाठी येथे नेहमीच गर्दी असते.
धार-इंदूर, वणी ते दिंडोरीच्या पायथ्यापासुन तसेच पुणे, मुंबई, नगर, नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्रातून देवीचे भाविक-भक्त दर मंगळवारी, पौर्णिमेस देवीच्या दर्शनासाठी येथे येत असतात. देवीची पुजा गोरे पाटील करीत आहेत. दररोज सकाळी ८ व संध्याकाळी ६ वजता नियमित आरती व ओलांडा या ठिकाणी होत असते. विषेशकरुन भाविकांची या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दर पौर्णिमेस रात्री व आषाढ, श्रावण महिन्यातील मंगळवारी सायंकाळी गावातून येमाई देवीच्या पालखीची सवाद्य मिरवणूक निघते. नवरात्रात देवीचा ९ दिवस मोठा ऊत्सव साजरा केला जातो. होम-हवन व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने साजरे करण्यात येतात.

श्री येमाई देवीच्या प्राचीन मंदीराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून, सभोवताली असलेले मोठ-मोठे वट व्रुक्ष, उत्तरेस पायऱया असलेली ऐतिहासीक बारव (विहिर), मंदीरातील प्रशस्त गाभारा, समोर मोठा सभा मंडप, देवालयाच्या सभोवताली मोठ्या तटबंदीचा वाडा त्यास पुर्वेकडून व दक्षीणेकडून असलेली भव्य प्रवेशद्वारे, मंदीरा समोरच दोन मोठ्या घाट्या असून, पुर्वेकडील दरवाजा जवळ दोन भले मोठे नगारे आहेत. मंदीराच्या आवरामध्ये ३ ऊंच दिपमाळी असुन नवरात्र,चैत्री पौर्णिमेस त्या पेटविल्या जातात. देवीच्या दर्शनासाठी येथे मुक्कामी येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची सोयीसाठी आवारातच खोल्या बांधलेल्या आहेत. मंदीराच्या मागील बाजूस १५ फूट खोल दगडी बांधकामातील महादेवाचे मंदीर असून दगडी पिंड व दगडी नंदी हे मंदीराचे वैशिष्ठ्येआहे. महादेवाच्या मंदीरातून ३ कि.मी. अंतरावर कवठे गावात असलेल्या राजवाड्या पर्यंत पूर्वी भूयारी मार्ग होता.
Nearby cities:
Coordinates:   18°52'7"N   74°10'57"E
This article was last modified 13 years ago