सिव्हिल हॉस्पिटलच्या ' बी ब्लॉक ' इमारत (कोल्हापूरच्या बाधकाम व्यवसायिकाने ही इमारत बांधून दिली आहे.) (सोलापूर)

India / Maharashtra / Sholapur / सोलापूर
 रूग्णालय  गट निवडा
 Upload a photo

मोडके पंखे , काळवंडलेल्या ट्यूब , बंद असलेली लिफ्ट , शौचालयांची झालेली दुरवस्था आणि दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची करण्यात आलेली उधळपट्टी यामुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या ' बी ब्लॉक ' इमारतीचे तीन-तेरा वाजले आहेत. पखे बंद असल्यामुळे पेशंटना घरातून पखे आणावे लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याकडे सरळ-सरळ दुर्लक्ष करून पेशंटच्या ज‌िवाशी खेळ करण्याचा उद्योग मांडला आहे. दरम्यान , आठवडाभरापूर्वीच ऑक्सिजन अभावी दोन बाळांचा मृत्यू झाल्यानंतरही आता बांधकाम खाते आणखी पेशंट दगावण्याची वाट पाहत आहे काय , असा संतप्त सवाल पेशंटच्या नातेवाईकांकडून विचारण्यात येत आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार असलेले बांधकाम खात्याचे उपकार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. चार वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या बाधकाम व्यवसायिकाने ही इमारत बांधून दिली आहे. ' बी ब्लॉक 'ही इमारत बांधल्यानंतर त्याची कायमस्वरुपी दुरुस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर आहे. दरम्यान , ' बी ब्लॉक ' च्या इमारतीमध्ये पेशंटसाठी खोल्या , ऑपरेशन थीएटर , वैद्यकिय अधिकाऱ्यांची कार्यालये , मेडिसिन , आयसीयू , सर्जरी तसेच आर्थोपेडिक वॉर्ड आदी सुविधांसह ७३३ बेडची व्यवस्था आहे. असे असले तरी सिव्हिलची दररोजची ओपीडी दीड हजारांची असून , यातील पाचशेच्यावर पेशंट दररोज अॅडमिट होतात. ही इमारत बाधून चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या चार वर्षांत बांधकाम विभागाने देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च केला आहे. तरीही या इमारतीत सुविधांची कमतरताच भासत आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   17°39'50"N   75°54'44"E
  •  246 किमी.
  •  252 किमी.
  •  353 किमी.
  •  354 किमी.
  •  519 किमी.
  •  522 किमी.
  •  592 किमी.
  •  697 किमी.
  •  700 किमी.
  •  804 किमी.
This article was last modified 12 वर्षांपूर्वी