भीमाकोरेगावच्या युद्धभूमीवर जयस्तंभ (पेर्णे फाटा)

India / Maharashtra / Koregaon / पेर्णे फाटा
 Upload a photo

भीमाकोरेगाव येथील लढाईत ब्रिटिशांच्या ‘बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री’च्या तुकडीतील ५०० महार सैनिक इंग्रजांच्या बाजूने लढले. त्यावेळी मराठा सैनिकांचे नेतृत्व दुसऱ्या बाजीरावांकडे होते. महार सैनिकांच्या अतुलनीय शौर्याच्या आधाराने अवघ्या ७००-८०० सैनिकांच्या जोरावर इंग्रजांनी २८ हजार सैनिकांची कुमक असलेल्या पेशव्यांचा पराभव केला, अशी इतिहासात नोंद आहे. त्यानंतर पेशवाईचा अस्त झाला आणि इंग्रजांची राजवट सुरू झाली. त्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या महार सैनिकांच्या स्मरणार्थ इंग्रजांनी भीमाकोरेगावच्या युद्धभूमीवर जयस्तंभ उभारला. १ जानेवारी २०१८ ला भीमाकोरेगावच्या ऐतिहासिक लढाईला दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त जयस्तंभाच्या परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर येत्या १ जानेवारीला शासनाच्या वतीने खास कार्यक्रमही घेण्यात येईल, असे सामाजिक न्यायमंत्र्यांनी सांगितले.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°38'34"N   74°3'15"E
  •  34 किमी.
  •  128 किमी.
  •  162 किमी.
  •  324 किमी.
  •  457 किमी.
  •  581 किमी.
  •  701 किमी.
  •  747 किमी.
  •  829 किमी.
  •  879 किमी.
This article was last modified 7 वर्षांपूर्वी