नरखेड रेलवे स्टेशन (नरखेड)

India / Maharashtra / Narkhed / नरखेड
 रेल्वे स्थानक  गट निवडा

नरखेड-अमरावती या नवीन रेल्वे मार्गाचे काम पूर्णत्वास आले आहे. नरखेड यार्डमधील रेल्वे ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे. २ मे रोजी नवीन प्लॅटफॉर्मवरून गाडीची ट्रायल घेण्यात आली. १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिहराव यांच्या हस्ते नरखेड येथे या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन झाले होते. तब्बल २२ वर्षांनी हा मार्ग पूर्णत्वास आला आहे. काही दिवसांपूर्वी या मार्गावरून चाचणी घेण्यात आली होती, पण बेनोडा (बारगाव) जवळ इंजिन नादुरुस्त झाले होते. आज २ मे रोजी नरखेड येथील नागपूर-इटारसी पॅसेंजर गाडी नवीन ट्रॅकवरून जात असताना पाहणी करताना अभियंता व कंत्राटदार. या मार्गावरील नवीन प्लॅटफॉर्मवर दिल्ली-चेन्नई या मार्गावरील गाड्या थांबविण्यात आल्या. सर्वप्रथम नागपूर-इटारसी ही सवारी गाडी या प्लॅटफॉर्मवरून धावली. नंतर गोंडवाना व ग्रँडट्रंक एक्स्प्रेस या नवीन प्लॅटफॉर्मवर थांबा घेऊन सोडण्यात आल्या. नरखेड- अमरावती १३८ कि.मी.च्या रेल्वेमार्गावर एकूण १५ स्टेशन्स आहेत. रेल्वेचे उपमुख्य अभियंता नरेश गुरबानी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता ए. के. जैन, उपविभागीय अभियंता बरहैयाजी, सक्सेना, रायकवार तसेच कंत्राटदार महेंद्र वासाडे, श्रवण साड आदी यावेळी उपस्थित होते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°28'7"N   78°31'29"E
This article was last modified 10 वर्षांपूर्वी