किल्ले रामगड ,(कोकणातील कणकवली-आचरे मार्गावर ठाण मांडून बसलेला नितांतसुंदर पण उपेक्षित असा किल्ला)
India /
Maharashtra /
Kankavli /
World
/ India
/ Maharashtra
/ Kankavli
जग / भारत / महाराष्ट्र / राजमाची
खेडेगाव
गट निवडा

किल्ले रामगड , कोकणातील कणकवली-आचरे मार्गावर ठाण मांडून बसलेला नितांतसुंदर पण उपेक्षित असा किल्ला. गड नदी (कालावली) च्या काठावरील एका छोट्या टेकडीवर वसलेला हा बळकट बांधणीचा किल्ला . समुद्रसपाटीपासून पक्त ५० मीटर उंचीवर उभा आहे. जांभ्या दगडाची खणखणीत तटबंदी , त्यात बांधलेले तब्बल १५ बुरूज , एकाहून एक सरस तीन दरवाजे , गणरायाची आगळी-वेगळी मूर्ती , सर्वांना आपल्या धाकात ठेवणारा वेताळदेव , राजवाड्याचा सुंदर चौथरा व इतिहासकाळातील अनेक तोफा या दुर्गावशेषांमुळे किल्ले रामगड दुर्गअवशेष संपन्न बनला आहे.
रामगडला भेट देण्यासाठी आपणास प्रथम मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवलीला पोहोचावे लागते. कणकवलीहून गड-पायथ्याचे रामगड फक्त १५ कि.मी. अंतरावर असून ते कणकवली-आचरे मार्गावरच आहे. पायथ्याच्या रामगड गावातून गडमाथा २० मिनिटांच्या चालीवर असून गडावर पाण्याची सोय नाही. त्यामुळे गावात पाण्याच्या बाटल्या भरून गडमाथा गाठावा लागतो.
रामगडच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला बुरूज असून या प्रवेशद्वारातून आत गेल्यावस दोन्ही बाजूस असणाऱ्या पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. त्या पाहून दरवाजाच्या माथ्यावर चढण्यासाठी असणाऱ्या जिन्याने प्रवेशद्वाराचा माथा गाठायचा. येथून सभोवार नजर टाकताच रामगडाचा झाडीभरला माथा पाहायला मिळतो. या गडाची संपूर्ण तटबंदी व बुरूज जांभ्या दगडात बांधलेली असून यातील दरजा भरण्यासाठी चुन्याचा अगर कशाचाच वापर केलेला नाही. तरीही गडाची तटबंदी आजही बऱ्यापैकी अवस्थेत आहे.
प्रवेशद्वाराच्या माथ्यावरून खाली उतरायचे व मुख्य दरवाज्यातून फक्त ५० फूट अंतरावर त्याच तटात बांधलेल्या दुसऱ्या दरवाज्यात पोहोचायचे. आपण हा दरवाजा पाहून परत गडप्रवेश केलेल्या मुख्य दरवाजाजवळ यायचे व येथून सरळ पुढे जाणाऱ्या पायवाटेने गड पाहायला सुरूवात करायची. या वाटेने पुढे जाताच डाव्या हातास एका झाडाखाली वारूळांनी सभोवार फेक धरलेला वेताळदेव दिसतो. भूतनाथ किंवा वेताळदेव हा कोकणवासियांत आपल्या धाकात ठेवणारा देव म्हणून ओळखला जातो. हा वेताळदेव पाहून पुढे गेल्यावर चारी बाजुंनी भक्कमपणे बांधलेला राजवाडा दिसतो. राजवाड्यात गेल्यावर समोरच तुळशीवृंदावन व ओवऱ्यांच्या भिंती लक्ष वेधून घेतात. या सर्वात लक्षवेधक गणरायाची मूर्ती एका देवळीत असून या मूर्तीच्या पायात सात कवट्या व गळ्यात नरमुंडमाळा आहेत.
रामगडावरील बाप्पांची ही मूर्ती तंत्रमार्गीयांची असून या मूर्तीची एकूणच दुर्मिळ घडण पाहता तिची जपणूक गरजेची ठरते. हा वाड्याचा परिसर पाहून याच्या थोड्या पाठीमागे असणाऱ्या गडावरील सदरेवर जायचे. सदरेच्या समोरच वेगवेगळ्या आकाराच्या व वेगवेगळ्या उंचीच्या जमिनीत उलट्या पुरून ठेवलेल्या सात तोफा दिसतात. तोफांशेजारीच जांभ्या दगडातील समाधी आहे. या तोफा व समाधी पाहून त्यासमोरील गड नदीच्या दिशेस असणाऱ्या गडाच्या तिसऱ्या दरवाजात जायचे. अत्यंत भक्कम बांधणीचा दरवाजा सद्यस्थितीतील त्याच्यावरील झुडुपांमुळे कमकुवत बनला आहे.
हा गड शिवकालात बांधला असला पाहिजे. १८ व्या शकतात पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यातील लढाईवेळी तुळाजीने रामगड जिंकून घेतला. पुढे १८०४-०५ मध्ये गड परत पेशव्यांच्या ताब्यात गेला. तर ६ एप्रिल १८१८ मध्ये कॅप्टन पिअरसनच्या नेतृत्वाखाली गड इंग्रजांनी जिंकून घेतला. १८६२च्या पाहणीनुसार रामगडावर २६ तोफा व १०६ तोफगोळे असल्याचा महत्त्वपूर्ण उल्लेख आहे.

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 16°14'13"N 73°36'42"E
- किर्लोस-आंबवणेवाडी गाव, कणकवली 2.8 किमी.
- parab & patade wadi 5.3 किमी.
- Bidwadi 7.3 किमी.
- Varchi Madhav-wadi, Poip 7.6 किमी.
- Mahendra Sawant 8.5 किमी.
- वायंगवडे 9 किमी.
- Mungekar Wadi 11 किमी.
- Sanjay Bagwe House 14 किमी.
- Kudopi 14 किमी.
- balogeechi wadi, malegoan 14 किमी.
- GANGASHVAR RACHA DEAUL 0.4 किमी.
- Ramgad Deual Wadi 0.4 किमी.
- shantaram govind bhave ani parivar 1.7 किमी.
- श्रीगोवर्धनेश्वर मंदिर, श्रीब्रह्मेंद्रस्वामीं 2.6 किमी.
- किर्लोस-आंबवणेवाडी साकव, कणकवली 2.7 किमी.
- parab 3.1 किमी.
- मालवण 13 किमी.
- देवगड़ तालुका 22 किमी.
- कणकवली तालुका 23 किमी.
- कुडाळ तालुका 26 किमी.