कुलकर्णी गार्डनशेजारी ' शिवाई ' (नाशिक)

India / Maharashtra / Nashik / नाशिक
 निवास  गट निवडा
 Upload a photo

नाशिकने महाराष्ट्राला अनेक प्रतिभावंत लेखक दिले पैकी वसंत कानेटकर हे न विसरता येणारं नाव . नाशिकला कुलकर्णी गार्डनशेजारी ' शिवाई ' नावाच्या बंगल्यात कानेटकरांचे अखेरपर्यंत वास्तव्य होते . कानेटकर हे नाशिकचं भूषण असले तरीही त्यांना नेहमीच सापत्नपणाची वागणूक मिळाली हे कुणीही नाकारणार नाही . शीतल प्रकाश देणाऱ्या चंद्राची स्तुती सारं जग करतं परंतु स्वत : तळपून जीवनदायी किरणं देणाऱ्या सूर्याला लोक नावंच ठेवतात , असंच काहीसं कानेटकरांच्या बाबतीत झालं . ज्या काळात काही लेखकांच्या वाट्याला अनंत प्रसिध्दी येत होती त्या काळात गरजणारं हे वादळ मात्र दुर्लक्षित होत गेलं . इतकं की नाशकातील साहित्यिकांनी त्यांना जयंतीदिनीसुध्दा लक्षात ठेवण्याचे कष्ट घेतले नाहीत . पण असं का झालं , त्यामागे काही कारणं असतीलच . तात्यासाहेबांच्या घरात शेकडोंनी माणसं रहात असतील तेथे कानेटकरांच्या घरात मात्र चाहत्यांचा फारसा वावर नसे . काही लेखक अंतर्मुख असतात , जी . ए . कुलकर्णीसारखे . एकदा म्हणे त्यांना भेटायला कुणी मोठा लेखक आला तर हे महाशय मागच्या दरवाजाने बाहेर निघून गेले . जो जसा लिहितो तसा त्याचा पिंड असतो , कानेटकरांचा पिंड रागीट होता . त्यांना स्तुती आवडत नसे . कलकलाट आवडत नसे त्यामुळे ते कुणाला जवळ करीत नसे परंतु त्यांच्या प्रतिभेला पावती देण्यासाठी या बाबी नजरअंदाज करता याव्यात , अर्थात त्यासाठी वाचकांकडेही जिगर लागतं . कुणी म्हणेल की कानेटकर नाशिकचे नव्हते त्यांना कशाला लक्षात ठेवायला हवे परंतु आपल्या शहरात जो आश्रयाला आला , त्याला अभय देण्याचा इतिहास आहे . कानेटकरांना ते अभय देण्यात ना ‌ शिककर कमी पडले हे जयंतीदिनी त्यांची आठवण नसल्याच्या घटनेवरून अधोरेखित होतेच .
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°0'5"N   73°46'22"E
  •  10 किमी.
  •  123 किमी.
  •  156 किमी.
  •  178 किमी.
  •  479 किमी.
  •  540 किमी.
  •  847 किमी.
  •  899 किमी.
  •  983 किमी.
  •  1026 किमी.
This article was last modified 12 वर्षांपूर्वी