देवास

India / Madhya Pradesh / Dewas /
 शहर, mandal headquarter (en), district headquarter (en)

तालुक्यातील देवास, जिल्हा देवास, मध्य प्रदेश
सुप्रसिद्ध राजा विक्रमादित्य याने इ.स.पूर्व ५६ साली माळव्यातील उज्जन (तेव्हाची 'उज्जयिनी' नगरी) येथे आपले राज्य स्थापन केले. त्याचे वंशज निरनिराळ्या प्रदेशांत जाऊन स्थायिक झाले. हे सर्व परमार घराण्याचे राजपूत होते. त्यांच्यातील काही दख्खनमध्ये गेले, त्यांनी पवार असे आडनाव लावले. १७२८ साली बाजीराव पेशव्यांनी माळव्याची मोहीम काढली, त्यात तुकोजी व जिवाजी या दोन पवार बंधूंचा सहभाग होता. माळवा मोहिमेत या पवार बंधूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे बाजीरावाने त्यांना मध्य प्रदेशातील देवास हे शहर आणि आसपासची काही खेडी इनाम म्हणून दिली.
पवार बंधूंनी देवास येथे आपली राजधानी ठेवून १७२८ सालाच्या अखेरीस देवासचे राज्य स्थापन केले.
पुढे देवास राज्याची सारखी विभागणी होऊन त्यातील सीनियर देवासचा अंमल तुकोजीराव पवारकडे, तर ज्युनियर देवासचा अंमल जिवाजीरावकडे आला. देवासमधून जाणाऱ्या रस्त्याने राज्याचे दोन भाग सारखे केले होते. १८१८ साली दोन्ही देवास राज्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसह संरक्षण करार करून ब्रिटिश तनाती फौजेचे संरक्षण घेतले.
इंदौरपासून ३६ किमी अंतरावर असलेले देवास हे सध्या मध्य प्रदेशातील औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. भारत सरकारचा चलनी नोटा छापण्याचा मोठा छापखाना तिथे आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   22°57'44"N   76°2'56"E
  •  33 किमी.
  •  130 किमी.
  •  255 किमी.
  •  268 किमी.
  •  310 किमी.
  •  310 किमी.
  •  378 किमी.
  •  428 किमी.
  •  428 किमी.
  •  455 किमी.
Array