USA Consulate
India /
Maharashtra /
Mumbai /
World
/ India
/ Maharashtra
/ Mumbai
जग / भारत / महाराष्ट्र / मुंबई
consulate / consular section / consul residence (en)
गट निवडा
सुमारे एकशेवीस वर्षांपूर्वी, विवेकानदांनी एका विद्यार्थ्याला सल्ला दिला की, 'अमेरिकेतील शिक्षण पद्धती एखाद्या माणसातल्या सर्वोत्कृष्ट गुणांचा विकास करते. अमेरिकेत अभ्यास केल्याने विद्यार्थी स्वतःची आणि भारताची उन्नती करू शकतील.' शिक्षणाचे जागतिक महत्त्व ओळखून, २८ मे रोजी आम्ही मुंबईतील अमेरिकन वकिलातीबरोबरच अमेरिकी वकिलातींची अन्य कार्यालये, अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी उघडली आहेत. या दिवसाला आम्ही "विद्यार्थी व्हिसा दिवस" असे नाव दिले आहे. हा दिवस, अमेरिकी दूतावासाच्या भारतातील वार्षिक परंपरेचा भाग झाला आहे आणि जो आम्ही मोठ्या अभिमानाने साजरा करतो. या विशेष दिवसाच्या अखेरीस जेव्हा आमच्या सगळ्या कार्यालयांमधले काम आटोपेल, तेव्हा भारतातील चार हजारांहून अधिक संभाव्य विद्यार्थ्यांच्या मुलाखती झालेल्या असतील. आपले विद्यार्थी आपल्या देशासाठी महान कामे करतील, अशी विवेकानंदांची अपेक्षा होती. आम्हीही भारतीय विद्यार्थ्यांकडून तशीच अपेक्षा करतो. हे विद्यार्थी भारतामध्ये आणि जगभरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील. म्हणूनच आम्ही, विद्यार्थी व्हिसा दिवस साजरा करतो. यानिमित्ताने सर्व व्हिसा प्राप्त विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 19°3'53"N 72°52'8"E