जिंजीचा किल्ला
| ऐतिहासिक, तटबंदी
India /
Tamil Nadu /
Gingi /
World
/ India
/ Tamil Nadu
/ Gingi
जग / भारत / तामीळनाडू /
ऐतिहासिक, तटबंदी
महाराष्ट्राप्रमाणेच राज्याबाहेरही अनेक गडकोट भटक्यांना सतत आकर्षित करत असतात. तामीळनाडूमधील जिंजीचा किल्ला असाच. त्याचा विस्तार, त्याचे ते तीन बालेकिल्ले, किल्ल्यातील अनेक इमारती आणि मोठा इतिहास या साऱ्याच गोष्टी इथे येणाऱ्याला खिळवून ठेवतात. शिवाजीमहाराजांचा दक्षिण दिग्विजय म्हटल्यावर आधी आठवते ती जिंजी. जिंजीचा किल्ला पाहताना किल्ले राजमाची आणि देवगिरी नजरेसमोर येतात कारण या तिन्हीमध्ये काहीतरी साम्य निचितच जाणवते. या किल्ल्याचा विस्तार प्रचंड या सदरात मोडतो. या सर्व विस्तीर्ण प्रकाराला भक्कम जाडजूड ११.२ किलोमीटर लांबीची दगडी तटबंदी आहे. त्या पलीकडे पूर्वी खोल खंदकही होता. विस्तीर्ण आवारात देवगिरीप्रमाणे भरपूर पाण्याची सोय आणि शेती आहे. देवगिरीला एक तर राजमाचीला दोन (श्रीवर्धन आणि मनरंजन) तर येथे तीन बालेकिल्ले आहेत. येथील तीनही बालेकिल्ले काही अंतरावर आहेत. ते राजमाचीप्रमाणे चिकटून नाहीत. राजगिरी, कृष्णगिरी आणि चांद्रायण अशी त्यांची नावे आहेत. या तीनही टेकडय़ा या प्रचंड आकाराच्या शीलाखंडांपासून बनलेल्या आहेत. एकावर एक गोटे रचल्याप्रमाणे आणि त्यामुळे सर्व पावसाचे पाणी झिरपून जाते. या टेकडय़ांवर नसíगक पाण्याची टाकी नाहीत. पण येथे विहिरी आणि अनेक हौद आढळतात. आज निगा नसल्याने हे हौद आणि विहिरी कोरडे ठणठणीत पडले आहेत. अर्थात बालेकिल्ल्यांवर पाण्याचा थेंबही नाही. त्यामुळे इथे भटकण्यापूर्वी आधी पुरेसे पाणी सोबत न्यावे. पायथ्याला स्वच्छ आणि शुध्द पाण्याची सोय आहे. किल्ल्यात अर्काट आणि मग पॉण्डिचेरी दरवाजातून प्रवेश होतो. आज याचे अवशेषच आहेत. येथे व्यंकटरमणस्वामींचे सुंदर देवालय आहे. पूर्वी येथे मूर्ती नव्हती पण नुकतीच नरसिंहमूर्तीची स्थापना झाली आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर समुद्रमंथनाचे सुरेख शिल्प आहे. या मंदिराचे सुरेख खांब पोर्तुगीजांनी पळवले असे सांगतात. जवळच धान्यकोठारे आहेत. बऱ्याच पुष्करिणी आहेत. तालीमखाना (शरीर संवर्धनासाठी) आहे. काही निवासी महाल आहेत. देवालये आहेत. एका राजाच्या लग्नाप्रीत्यर्थ बांधलेला कल्याण महालही सातमजली आणि अतिशय सुंदर इमारतही दिसते. या सातमजली इमारतीमध्ये वपर्यंत खापरीनळाने पाणीपुरवठा केला होता. - See more at: www.loksatta.com/trekit-news/article-on-jinji-fort-1163...
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 12°14'58"N 79°23'57"E
Array