भाऊचा धक्का (मुंबई)

India / Maharashtra / Mumbai / मुंबई
 धक्का  गट निवडा
 Upload a photo

आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे अथक परिश्रमामुळे लोकांच्या सोयीसाठी उभारलेले हे बंदर साऱ्या देशांत परिपूर्ण व आदर्श व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. भाऊंची तत्त्परता व कौशल्य यावर खूश होऊन इंग्रजांच्या राज्यातील 'ईस्ट इंडिया' या कंपनीनेही त्यांना प्रथमपासून शेवटपर्यंत या बंदराच्या बांधकामाचा व सर्वसुधारणांचा दीर्घकालीन मक्ता दिला होता यावरूनच त्यांची व त्यांच्या कामाची महती कळते. आणि त्यांच्या मनाच्या मोठेपणाचा सर्वात कळस म्हणजे त्यांनी म्हणजे भाऊनी स्वकष्टानी बांधलेल्या या मुंबई बंदराला त्यावेळच्या गव्हर्नरचे म्हणजे 'कारनॅक' साहेबांचे नाव द्यावे ही त्यांनी केलेली सूचना! आज आज 'कारनॅक' बंदरपेक्षाही भाऊचा धक्का हे नावच समाजमनावर खोलवर कोरले गेले आहे व ते तसेच अजरामर होणार. असे निस्वार्थी मनाचे, कठोर परिश्रम करणारे, प्रतिकूल परिस्थितीतही समाजाच्या सोयीसाठी झटणारे भाऊ प्रत्येक पिढीत तयार झाले तर खरोखर देशाची प्रगती नक्कीच झपाटय़ाने होईल. पण आत्ताचे समाजाचे व राजकारणाचे चित्र पहाता मन उदासच होते.
'सलाम' त्या भाऊच्या धक्क्य़ाला व 'त्रिवारवंदन' आपले अजिंक्य हे नाव खऱ्या
अर्थाने सार्थ करणाऱ्या लक्ष्मण अजिंक्य ऊर्फ भाऊ रसूल यांना!



महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने भाडेवाढ करण्यास परवानगी दिल्यानंतर शनिवारपासून भाऊचा धक्का ते रेवस मार्गावरील लाँचसेवा सुरू करण्याचा निर्णय मुंबई जलवाहतूक सहकारी संघटनेने अखेर घेतला. त्यामुळे या स्वस्तातील लाँच सेवेवर अवलंबून असलेल्या अलिबाग तालुक्यातील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. आता या लाँचसेवेच्या तिकिटासाठी पूर्वीच्या ५० रुपयांऐवजी ६५ रुपये मोजावे लागतील. तर भाऊचा धक्का ते मोरा (उरण) या सेवेसाठी ३५ ऐवजी ४५ रुपये द्यावे लागतील.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°57'22"N   72°50'57"E
  •  29 किमी.
  •  102 किमी.
  •  152 किमी.
  •  257 किमी.
  •  460 किमी.
  •  589 किमी.
  •  801 किमी.
  •  833 किमी.
  •  899 किमी.
  •  977 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी