रायरेश्वर डोंगरी पठार

India / Maharashtra / Dehu Road /
 डोंगर, plateau (en)
 Upload a photo

रायरेश्वरला काय पाहाल?
रायरेश्वर मंदिर, गोमुख, नाखिंद टोक, सप्तरंगी माती, पावसाळ्यानंतर असंख्य रानफुलं, पांडव लेणी, केंजळगड आणि अस्वलखिंडची भटकंती जोडून करता येईल. रायरेश्वर हे सहकुटुंब भटकंती करता येण्यासारखं ठिकाण आहे. इथे राहणं आणि जेवण्याची व्यवस्था जंगम मंडळी उत्तमप्रकारे करतात.
कसे जाल?
कोर्ले या भोर तालुक्यातल्या गावातनं थेट रायरेश्वरावर जाता येतं. दक्षिणेकडून जांभळीची निसणी, उत्तरेकडून कारीचे लोहदार, रायरी गावातून सांबरदार, दापकेघरचे वाघदार या वाटांशिवाय कोकणातून अस्वलखिंडीमार्गे कामथे गावातूनही रायरेश्वरावर येता येतं. या सगळ्या वाटांनी रायरेश्वर गाठायला तीन ते चार तास पुरतात. अपवाद अस्वल खिंडीचा. तिथून रायरेश्वरासाठी एक दिवस द्यावा लागतो.
रायरेश्वर हे महाराष्ट्रातल्या डोंगरी पठारांपैकी मोठं आणि निसर्गसमृद्ध पठार आहे. रायरेश्वराचा भूभाग हा सुमारे ४५ किलोमीटर अंतराचा आहे. तो राजगड किल्ल्याच्या घेराहून अधिक लांबीचा आहे. भूगोलात हे महत्त्वाचं असलं, तरी इथल्या इतिहासानं रायरेश्वराला अधिक महत्त्व प्राप्त करून दिलं आहे. जिजाऊंच्या प्रेरणेतून शिवछत्रपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १६४५ च्या सुमारास इथल्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतल्याचं सांगितलं जातं. त्यापुढे शिवरायांनी घडवलेला इतिहास अलौकिकच आहे. मराठी साम्राज्याचा श्रीगणेशा या ठिकाणी झाला असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. रायरेश्वर हे भारतातल्या सर्वाधिक पावसाच्या उंचीवरील पठारी प्रदेशांमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या भागात मोडतं, हेही अनेकांना माहीत नसतं.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°2'38"N   73°42'5"E
  •  62 किमी.
  •  148 किमी.
  •  225 किमी.
  •  373 किमी.
  •  483 किमी.
  •  595 किमी.
  •  666 किमी.
  •  701 किमी.
  •  774 किमी.
  •  842 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी