सीएमई तलाव

India / Maharashtra / Khadki / Old Pune - Mumbai National Highway
 Upload a photo

पाणवठ्यांवरील पक्ष्यांसाठी 'कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग'चा जलाशय हा सर्वांत उत्तम अधिवास ठरला असून, खडकवासला, पानशेत आणि भिगवण जलाशयांना पक्ष्यांनी नापसंती दर्शवली आहे. घनकचरा, पाणवनस्पतींची बेसुमार वाढ आणि राडारोडा टाकल्यामुळे पुणे परिसरातील बहुतांश पाणवठे जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून धोक्यात आले आहेत, असे निरीक्षण पुण्यात नुकत्याच झालेल्या 'बर्ड मॅपिंग'मधून पुढे आले आहे. राज्य वन विभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य पातळीवर वेटलँड बर्ड्स अर्थात पाणथळ जागांवर येणाऱ्या पक्ष्यांचे मॅपिंग करण्यास सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत पक्षिमित्रांनी दोन महिन्यांपूर्वी म्हातोबा तलाव, सीएमई, भिगवण, चाकसमान धरण, नाईक बेट, कासरसाई धरण, खडकवासला, पानशेत आणि मुळा-मुठा पक्षी अभय प्रदेशाचे सर्वेक्षण अभ्यासकांनी नोंदवले. या माहितीच्या आधारे उपक्रमाचे समन्वयक किरण पुरंदरे यांनी पुण्यातील पाणवठ्यांवरील पक्षिजीवनाचा अहवाल तयार केला आहे. सर्वेक्षणादरम्यान सर्वाधिक ८० पक्ष्यांच्या जाती भिगवण जलाशयात आढळून आल्या आहेत; पण अनियंत्रित पर्यटन, घनकचऱ्याचे साम्राज्य आणि बेशरम नामक पाणवनस्पतीच्या बेसुमार वाढीमुळे पक्ष्यांचा अधिवास संकटात आल्याचे स्पष्ट झाले. या उलट 'सीएमई'च्या जलाशयामध्ये ३२ प्रकारचे पक्षी दिसले असून, यात स्टेप्सच्या गरुडाचीही तेथे नोंद झाली आहे. उत्कृष्ट संरक्षित प्रदेशाचा मान 'सीएमई'ला मिळाला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत पक्षीवैविध्याने समृद्ध असलेल्या खडकवासला ते पानशेत परिसरातही आता घनकचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. गाळ काढणे, गुरे चराई, राडारोड्यामुळे परिसंस्था धोक्यात आली आहे,
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°36'11"N   73°50'32"E
  •  11 किमी.
  •  112 किमी.
  •  163 किमी.
  •  319 किमी.
  •  478 किमी.
  •  566 किमी.
  •  709 किमी.
  •  751 किमी.
  •  830 किमी.
  •  886 किमी.
This article was last modified 9 वर्षांपूर्वी