केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळे (कापरा)

India / Maharashtra / Yavatmal / कापरा
 Upload a photo

यवतमाळ जिल्ह्यतील कापरा या आदिवासी गावातील केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेत शिकणाऱ्या सोनाली श्रावण फुपरे या सहावीच्या वर्गातील मुलीने लिहिलेली कविता बालभारतीच्या पाठय़पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम मुलांच्या अभिव्यक्तीला वाव देणारा असावा, या हेतूने यावर्षी प्रथमच राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांची कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण महामंडळाच्या या आवाहनाला हजारो विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. या कवितांतून सोनालीची ‘झाड’ कविता निवडली गेली. ‘कविता करू या’ या सदराखाली ती प्रसिद्ध झाली आहे. मुलीने खूप शिकावे. आपल्या मुलीची कविता ‘बालभारती’मध्ये आल्याने तिचे पालकही आनंदले आहेत. सोनालीला लिखाणाची आवड असून तिचे शिक्षकही तिला मदत करतात, असे तिचे वडील श्रावण फुपरे यांनी सांगितले. मला शिक्षणाची संधी मिळाली नाही मात्र सोनालीने खूप शिकावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°28'25"N   78°3'53"E
  •  320 किमी.
  •  458 किमी.
  •  500 किमी.
  •  552 किमी.
  •  563 किमी.
  •  811 किमी.
  •  896 किमी.
  •  915 किमी.
  •  972 किमी.
  •  1043 किमी.
Array
This article was last modified 9 वर्षांपूर्वी