एकता कॉलनी (नागपूर सुधार प्रन्यास स्टेडियम ) (नागपूर)
India /
Maharashtra /
Nagpur /
नागपूर
World
/ India
/ Maharashtra
/ Nagpur
क्रीडांगण (28)
गट निवडा
राज्य सरकारच्या विशेष अनुदानातून एकता कॉलनी, वांजरी येथे नागपूर सुधार प्रन्यास स्टेडियम उभारत आहे. या स्टेडियमचे भूमिपूजन सप्टेंबर २०१३ मध्ये झाले. यावेळी तयार करण्यात आलेल्या आराखडय़ानुसार व्हॉलिबॉल ग्राऊंड, बास्केट बॉल ग्राऊंड, आर्चरी ग्राऊंड, हिरवळ, लॅन्डस्केप, जॉगिंग ट्रॅक, टेनिस कोर्ट, प्रशासकीय इमारत स्टेडियमचा भाग होता. यासाठी अंदाजित खर्च साडेसहा कोटी रुपये होता. प्रारंभी दीड कोटी रुपये मंजूर करून नासुप्रने काम हाती घेतले. त्यासाठी १२ ऑक्टोबर २०१४ ला निविदा काढण्यात आली. त्यानसार जॉगिंग ट्रॅक, टेनीस कोर्ट, प्रशासकीय इमारत, ग्राऊंड लेव्हलिंग, स्ट्रॉम ड्रेन (नासुप्रचा निधी), विद्युतीकरणाचे काम करण्यात आली आहेत. मूळ आराखडय़ानुसार व्हॉलिबॉल ग्राऊंड, बास्केट बॉल ग्राऊंड, आर्चरी ग्राऊंड, हिरवळ, लॅन्डस्केप होणे बाकी आहे. शिवाय खेळण्यांच्या खरेदी व्हायची आहे. यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांची आहे. यासंदर्भात स्थानिक नगरसेवकाने जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्र्यांकडे स्टेडियमसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. नासुप्र दीड कोटी रुपयांची कामे करून स्टेडियम पूर्ण झाल्याचे सांगत आहे. निधी खर्च करून मूळ आराखडय़ानुसार कामे करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे त्या नगरसेवकाचे म्हणणे आहे. गेल्या तीन वर्षांपासून स्टेडियम काम सुरू असून निधीअभावी काम बंद असल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले. फुटबॉल, क्रिकेट, हॉकी या खेळांसाठी एक मैदान आणि बॉस्केट बॉल, व्हॉलिबॉल, कबड्डीसाठी वेगळे मैदान अपेक्षित असताना सर्व खेळांसाठी एकच मैदान विकसित करण्यात आहे. यावरही आक्षेप घेण्यात आला आहे. दरम्यान, सुधार प्रन्यासने स्पष्ट केले की, एकता कॉलनीतील या जागेला खेळाचे मैदान म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार निविदा काढून कामे झालेली आहे. खेळाचे मैदान असल्याने कोणताही खेळ येथे खेळता येणार आहे. झालेली कामे जॉगिंग ट्रॅक, टेनिस कोर्ट, प्रशासकीय इमारत, ग्राऊंड लेव्हलिंग, स्ट्रॉम ड्रेन न झालेली कामे (एनआयटी निधी), विद्युतीकरण. उर्वरित विद्युतीकरण, व्हॉलिबॉल ग्राऊंड, बास्केट बॉल ग्राऊंड, आर्चरी ग्राऊंड, खेळण्याची खरेदी, हिरवळ, लॅन्डस्केप. यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांची आवश्यकता.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 21°10'53"N 79°7'8"E
- DEVEN 0.6 किमी.
- दीक्षित नगर 1.4 किमी.
- sugat nagar pani ki tanki 1.9 किमी.
- कळमना रेल्वे स्टेशन 2.7 किमी.
- आकाशवाणी टॉवर 3.5 किमी.
- परशिवनी तालुका 27 किमी.