Dhondewadi (Dhondewadi)
India /
Maharashtra /
Rahimatpur /
Dhondewadi
World
/ India
/ Maharashtra
/ Rahimatpur
साताऱ्याजवळील धोंडेवाडी हे गाव गांधीजींच्या कल्पनेतल्या ग्रामस्वराज्याचे आदर्श उदाहरण. श्रमदानातून ग्रामविकासाबरोबरच बचतगटाच्या माध्यमातून जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. लोकसहभागातून विकसित गावाचे मॉडेल म्हणून धोंडेवाडीने आपली ओळख निर्माण केली आहे.
वीस वर्षांपूर्वी धोंडेवाडी अत्यंत मागास होती. गाव तसे आडवळणीच. त्यामुळे एसटी येत नव्हती. गावात एकही शौचालय नव्हते. जवळच्या आंगापूरचे माणिक शेडगे शेतात जायचे, तेव्हा धोंडेवाडीची शाळकरी मुले भेटायची. त्यांच्याशी ते संवाद साधत. हा संवाद त्यांना धोंडेवाडीत घेऊन गेला. गावातली परिस्थिती बघून त्यांनी काही नियोजन केले आणि स्वच्छतेपासून कामाला सुरुवात केली. गावकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला आणि तिथून नवी वाटचाल सुरू झाली.
गांधी म्हणत की कुणी एका तरुणाने मनावर घेऊन गावाची सेवा केली पाहिजे. गावातच सर्व बाबींची सोडवणूक झाली पाहिजे. आणि हे काम व्यक्तिगत पातळीवरच व्हायला पाहिजे. संस्था आली की ते काम तात्पुरते किंवा तकलादू होते. या विचारांवर निष्ठा ठेवून डॉ. माणिक शेडगे यांनी कामाला वाहून घेतले.
नक्षत्रबन हा गावातील एक अनोखा उपक्रम. एकूण २७ नक्षत्रे आहेत. प्रत्येक राशीचे आणि नक्षत्राचे वेगळे झाड असते, असे मानले जाते. ज्या नक्षत्रात जन्म झाला, त्या नक्षत्राच्या झाडाखाली माणसाला मन:शांती लाभते, अशी समजूत. राशी, नक्षत्र आणि नक्षत्रांचे झाड या गोष्टी कालबाह्य वाटू शकतात. परंतु डॉ. माणिक शेडगे यांनी त्या समजुतींना नवे संदर्भ जोडत भुंड्या टेकडीवर नक्षत्रबन फुलवले. गावाजवळची टेकडी म्हणजे दगड काढण्यासाठी, खाणकामासाठी हक्काचे ठिकाण. हे ओळखून टेकडीला पहारीचा स्पर्श होण्याआधीच त्यांनी तिथे नक्षत्रबनाची संकल्पना मांडली. गावकऱ्यांनी उत्साही प्रतिसाद दिला. अशी संकल्पना एका रात्रीत साकार होऊ शकत नाही. त्यासाठी काही वर्षे जावी लागतात. धोंडेवाडीने पाच वर्षांत तीनशे दुर्मीळ झाडे लावून टेकडी हिरवी केली. ती आता दत्तटेकडी म्हणून ओळखली जाते. एवढ्यावर ग्रामस्थ थांबले नाहीत तर तिचा नित्य उपयोग होऊ लागला. गावकऱ्यांच्या बैठका नक्षत्रबनात होतात. त्यामुळे धोंडेवाडी हे परिसरातील पर्यावरणाचे केंद्र बनले. वृक्षारोपण किंवा टेकड्या हिरव्या करण्याआधी आजुबाजूच्या गावातले लोक इथे येतात.
रवींद्रनाथ टागोरांनी अशी संकल्पना मांडली आहे की, यात्रा, उत्सवाच्या काळात लोकांना जे काही सांगितले जाते, ते लोक लक्षात ठेवतात. हीच गोष्ट ध्यानात घेऊन प्रबोधनासाठी यात्रेचा उपयोग झाला. गावात गोकुळाष्टमी जोरात होते. यादिवशी गो महोत्सव म्हणजे गायींचे प्रदर्शन भरवले जाऊ लागले. चांगल्या गायींचे क्रमांक काढून शेतकऱ्यांना सन्मानपत्रे देऊन सत्कार केला जाऊ लागला. प्रत्येक कुटुंब लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार असलेल्या गावाला 'लोकराज्य ग्राम' म्हटले जाते. राज्यात अशी गावे आहेत, परंतु धोंडेवाडी पहिले 'महिला लोकराज्य ग्राम' आहे. इथल्या महिला लोकराज्यच्या वर्गणीदार झाल्या. महिला सक्षमीकरणात धोंडेवाडी आघाडीवर आहे. सर्व महिला बचतगटाच्या सदस्य आहेत. गावात सात बचतगट. पैकी तीन गट स्वतंत्र उद्योग चालवतात, एक बचतगट दूध डेअरी, एक रास्त धान्य दुकान चालवतो. निर्मलग्राम बनलेल्या धोंडेवाडीला ग्रामस्वच्छता तसेच तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार मिळाला, त्यामध्येही महिला बचत गटांची भूमिका महत्त्वाची. वीस कुटुंबे सामुदायिक शेती करतात. सामुदायिक आले लागवड हेही गावाचे वैशिष्ट्य.
ज्ञानयात्री विवेकानंद वाचनालय सुरू करून हे ग्रंथालय आणि शाळेचे विद्यार्थी जोडून घेतले आहेत. वाचायला लागल्यामुळे छोट्याशा गावात अनेक मुलांमधून वक्ते तयार झाले आहेत. हा सगळा गाव पूर्वापार शाकाहारी आणि व्यसनमुक्त आहे. गावात कृष्णभक्त व दत्तभक्तांची संख्या खूप आहे. पूर्वी गावात गवळ्यांची संख्या अधिक होती. शाळीग्राम पूजनाची परंपरा असल्याने मांसाहार वर्ज्य असावा. ही परंपरा आजही पाळली जाते. नव्या पिढीनेही हसतमुखाने या शाकाहारी परंपरेचा स्वीकार केला आहे. नव्याने नांदायला आलेली सून असो अथवा या गावातून इतरत्र नांदायला गेलेल्या मुली असोत, सगळे शाकाहाराचे पालन करतात. मांसाहार वर्ज्य असल्याने गावात शेळी किंवा कोंबडीपालनही नाही. गायी पाळण्याची परंपरा असून पन्नासहून अधिक कुटुंबे गोपालन करतात. सेंद्रिय शेती करण्याकडे गावाचा कल आहे. डॉ. शेडगे यांनी गावाच्या विकासासाठी वाहून घेतले असून त्यांच्याच पुढाकाराने नवनव्या योजना राबवल्या जातात. कोणतीही सरकारी योजना राबवण्यामध्ये धोंडेवाडी अग्रेसर असते. गावाची एकीही अभूतपूर्व असून ग्रामपंचायतीची निवड बिनविरोध होते.
पाचशेहून अधिक लोकसंख्या असलेले धोंडेवाडी गाव सातारा तालुक्यात आहे. पुनर्रचनेनंतर या गावाचा समावेश कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात झाला. निर्मलग्राम चळवळ जोर धरू लागल्यानंतर ग्रामस्थांनी यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र, शौचालय बांधण्यासाठी सरकारी अनुदान घ्यायचे नाही असे ठरवले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज काढून ७५ शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. २००६मध्येच गाव निर्मल बनल. ज्या कुटुंबांकडे शौचालयासाठी जागा नव्हती, त्यांना सार्वजनिक जागा देण्यात आली. शौचालये शोषखड्ड्याची म्हणजे पर्यावरणपूरक आहेत.

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 17°33'43"N 74°7'54"E
- Kalbhairavnath Mandir 3 किमी.
- Bhagwan krishna pawar's home 3.3 किमी.
- Dipak Kanase' Royal Recidency 3.5 किमी.
- Angapur'S Triple Filtered Water Project 3.9 किमी.
- Gram panchyat varne 4.1 किमी.
- yogesh, shrimant ajit kalange house 4.5 किमी.
- ajit bhosale farm house 4.9 किमी.
- Asha S Pawar's house 5.1 किमी.
- RAJAN,SURAJ,SWAPNIL,SONALI NIKAM'S AGRO FARM 5.1 किमी.
- kalange chandrakant 5.9 किमी.
- kalbhairavnath 2.9 किमी.
- हनुमान व्यायाम मंड्ळ अंगापूर वंदन .Angapur Vandan . 3.1 किमी.
- ANGLAI MATA MANDIR 3.5 किमी.
- Shri kalbhairavnath vidhyalay 3.6 किमी.
- suvichar pawar's home 4 किमी.
- सातारा तालुका 19 किमी.
- कोरेगाव तालुका 19 किमी.