धरणाच्या मध्यभागी छोटेखानी टेकडी

India / Maharashtra / Ojhar /
 पर्यटन  गट निवडा
 Upload a photo

धरणाच्या मध्यभागी छोटेखानी टेकडी आहे. या धरणावर पर्यटकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल, शिवाय शासनाला कायमस्वरूपी महसूल मिळेल या उद्देशाने हे क्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचे निश्चित करण्यात आले. पर्यटन स्थळ विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार प्रस्तावित जागेत कुंपण घालणे, लॅण्ड स्केपिंग, क्लब हाऊस, जेटी बांधणे, कारंजा, रेस्टॉरंट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहनतळ आदी कामांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात जलाशयातील टेकडी विकसित करणे, टेकडीपर्यंत जाण्यासाठी बोटिंग उपलब्ध करून देणे, वॉटर पार्क वाहनतळ, लहान मुलांसाठी मनोरंजनासाठी इनडोअर व आऊटडोअर खेळणी बसविणे व इतर संबंधित कामे करण्यात येतील. या कामास सुरुवात झाली असली तरी जेमतेम २० ते २५ टक्के काम झाले आहे. तीन वर्षांत हे काम पूर्णत्वास नेण्याचे नियोजन होते. परंतु, प्रारंभी इतका विलंब झाल्यामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°17'16"N   73°52'11"E
  •  31 किमी.
  •  154 किमी.
  •  162 किमी.
  •  189 किमी.
  •  477 किमी.
  •  548 किमी.
  •  871 किमी.
  •  926 किमी.
  •  1012 किमी.
  •  1050 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी