मिरज तालुका (मिरज)

India / Maharashtra / Budhgaon / मिरज
 तालुका, invisible (en)
 Upload a photo

मिरज हे दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे आणि भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.मिरजेचा इतिहास गेल्या हजा‍र वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.

मिरज हे एक महत्वाचे रेल्वे जंक्शन आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही मिरज शहर प्रसिद्ध आहे.

शहरात वानलेस मेमोरियल रूग्णालय, वानलेस उरोरूग्णालय, मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे कर्करोग रूग्णालय आणि इतर अनेक रूग्णालये आहेत. शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रूग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधूनही अनेक लोक औषध उपचारांसाठी मिरजेला येतात.

मिरज शहर हे विविध प्रकारच्या तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक उस्ताद अब्दुल करीम खान यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   16°50'58"N   74°38'20"E
  •  217 किमी.
  •  314 किमी.
  •  371 किमी.
  •  391 किमी.
  •  500 किमी.
  •  531 किमी.
  •  539 किमी.
  •  621 किमी.
  •  676 किमी.
  •  760 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी