Wikimapia is a multilingual open-content collaborative map, where anyone can create place tags and share their knowledge.

Shree Mahamai Mandir

India / Maharashtra / Jalgaon /

पिसई गावाची गावदेवी "श्री महामाई देवी". अतिशय पुरातन देवस्थान. धुलिवंदनाच्या देवशी येथे साना भरतात. पिसई गावातील सर्व वाड्यांमधील भक्त मंडळी, मुंबई-पुण्याचे चाकरमानी आवर्जुन उपस्थीत असतात. महामाई देवीची पुजा झाल्यानंतर प्रत्येक वाडीवरचे "खेळी" आपापले खेळ देवीसमोर सादर करतात. बिवळावाडी व कासारवाडी चा डेर्याचा खेळ, कुंभारवाडी व काटकरवाडी चा नाचाचा खेळ, येसरेवाडी चा नकटापणा असे खेळ होतात. हे सर्व कार्यक्रम अतिशय सुसुत्रपणे होतात. नंतर होळी च्या माळावर देवीची पालखी नाचवून पालखी गावातील प्रत्येक घरी जाण्यासाठी निघते. आपण जगाच्या कोपर्यात कुठेही असलो तरी श्री महामाई आपले रक्षण करते अशी भावना प्रत्येकाच्या मनात असते म्हणून देवी पालखीतून आपल्या घरी येणार ही एक पर्वणीच असते. त्यासाठी आपल्या रोजच्या जीवनातील सर्व अडचणी बाजुला ठेवून लोक गावी येतात.
Nearby cities:
Coordinates:   17°47'16"N   73°16'32"E

Comments

  • तळेकर (guest)
    आमचे मित्र लकेश्री या गावचे रहिवासी आहेत
This article was last modified 16 years ago