भैरवगड

India / Maharashtra / Kankavli /
 डोंगर  गट निवडा

प्राचीन शिव कालीन मंदिर
कणकवली रेल्वे स्टेशन पासून २५ किलोमीटर वर आहे. येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दिगवळे रांजणगाव किंवा नरडवे भेर्देवादी या मार्गे जाता येते. दिगवळे रांजणगाव येथून जाण्याचा मार्ग हा सोपा आणि सरळ आहे. दिगवळे येथून मंदिरा पर्यंत चालत जाण्यासाठी एक ते दीड तासांचा वेळ लागतो. मंदिरात जाण्याचा मार्ग घनदाट निसर्गरम्य जंगलातून जातो. गडावर पोचल्यावर शिवकालीन जुन्या घरांचे चबुतरे पाहायला मिळतात. शिवकालीन तट बंदी पडीक स्वरुपात आढळते . मंदिरासमोर सर्वप्रथम दोन शिवकालीन तोफांचे दर्शन घडते . गडावर फक्त पावसाळी पाण्याची सोय आहे. इतर वेळी नाग्निच्या झऱ्या वरून पाणी आणावे लागते . गडावर जेवण करायची सोय आहे पण जेवणासाठी लागणारे साहित्य बरोबर घेऊन जावे लागते . गडावरून नरडवे येथे बांधत असलेल्या धरणाचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   16°13'55"N   73°53'31"E
  •  264 किमी.
  •  342 किमी.
  •  427 किमी.
  •  487 किमी.
  •  503 किमी.
  •  516 किमी.
  •  574 किमी.
  •  576 किमी.
  •  671 किमी.
  •  761 किमी.
This article was last modified 9 वर्षांपूर्वी