शाळे, सातारा जिल्ह्यातील साळशिरंबे गाव,सातवीपर्यंत गावातच (सातारा जिल्ह्यातील " साळशिरंबे" गाव)

India / Maharashtra / Karad / सातारा जिल्ह्यातील " साळशिरंबे" गाव
 प्राथमिक शिक्षण  गट निवडा
 Upload a photo

सातारा जिल्ह्यातील साळशिरंबे गावच्या संपत पांडुरंग शेंडगे या ध्येयवेड्या तरुणाची ही यशोगाथा आहे. आज ते शहापूर (जि. ठाणे) येथील क्रूगर व्हेंटिलेशन इंडिया लिमिटेड या कंपनीत अतिवरिष्ठ पदावर नोकरी करतात.
गरीब, मेंढपाळ कुटुंबातील संपतना घरच्यांनी देवर्षी बनवले. मळकट कपडे व केसांच्या लांबसडक वेण्या घालून संपत शाळेला जायचा. लोकांच्या समस्यांना खोटी उत्तरे देण्यास त्याला भाग पाडले जाई. शाळा सोडण्यासाठी मारही खावा लागे. सातवीपर्यंत गावातच शिकत असल्यामुळे फारशी अडचण जाणवली नाही. मात्र, आठवीला उंडाळे येथील हायस्कूलमध्ये प्रवेश घेताना मात्र शाळेने वेण्या कापण्याची अट घातली. घरच्यांनी प्रथम विरोध केला; मात्र संपतच्या निग्रहापुढे त्यांना नमते घ्यावे लागले. संपतने दहावीला शाळेत पहिला क्रमांक पटकावला. गुणपत्रक घेऊन घरी गेलेल्या संपतला शाबासकी देण्याऐवजी घरच्यांनी त्याला गावातील धार्मिक कार्यक्रमात ढोल वाजवण्यासाठी नेले.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   17°8'56"N   74°5'56"E
  •  166 किमी.
  •  256 किमी.
  •  327 किमी.
  •  442 किमी.
  •  481 किमी.
  •  562 किमी.
  •  593 किमी.
  •  667 किमी.
  •  696 किमी.
  •  736 किमी.
This article was last modified 12 वर्षांपूर्वी