सर्प उद्यान (कवयित्री बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय ) (पिंपरी-चिंचवड)

India / Maharashtra / Pimpri / पिंपरी-चिंचवड / SAMBHAJINAGAR
 निवास, बगीचा, serpentarium (en)
 Upload a photo

साधारणपणे २० वर्षांपूर्वी(1996) साडेआठ एकर जागेत प्राणिसंग्रहालय सुरू झाले. नंतर त्याचे कवयित्री बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय असे नामकरण झाले, मात्र सर्पोद्यान म्हणूनच त्याची ओळख आहे. विविध भागांत आढळून येणारे साप तसेच प्राणी या ठिकाणी आणून सोडले जातात. मुळातच येथे असलेले प्राणी व आणून सोडलेले प्राणी यांची योग्यप्रकारे निगा राखली जात नाही, प्राण्यांचे हाल होतात, संशयास्पद मृत्यू होतात, अशी जुनी तक्रार आहे. त्यातच पुन्हा घोणस, नाग, धामण, दिवड, तस्कर जातींचे साप तसेच दोन कासव मृत झाल्याने खळबळ उडाली. मृत झालेले साप अक्षरश: सडले होते. मण्यार बाटलीत मरून पडले होते. विषारी आणि बिनविषारी साप एकाच पोत्यात भरून ठेवले होते, ते मृतावस्थेत होते, असे आता उघड झाले आहे. एकूण आठ नाग, १० धामण, चार तस्कर, एक मण्यार, दोन कासव मृत झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आल्याचे सर्पमित्र सांगतात.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°39'40"N   73°47'57"E
  •  10 किमी.
  •  104 किमी.
  •  156 किमी.
  •  311 किमी.
  •  484 किमी.
  •  558 किमी.
  •  717 किमी.
  •  759 किमी.
  •  837 किमी.
  •  894 किमी.
This article was last modified 8 वर्षांपूर्वी