नागपुरातील झिरोमाइल (नागपूर)

India / Maharashtra / Nagpur / नागपूर
 स्मारक (मोन्यूमेंट), विशेष जागा

ब्रिटिशांनी १७६७ साली ' ट्रिग्नोमेट्रिक सर्व्हे ऑफ इंडिया ' ची स्थापना केली. या विभागाने परिश्रमपूर्वक अभ्यास करून १९०७ साली सीताबर्डी किल्ल्यालगतचे हे स्थान देशाचा केंद्रबिंदू म्हणून निश्चित केले. त्यावेळी पाकिस्तान , बांगलादेश भारतातच होते. त्यामुळे त्यांचाही विचार हा केंद्रबिंदू ठरविताना झाला होता. देशाच्या विभाजनानंतर भारताचा मध्यबिंदू जबलपूरजवळ निश्चित झाला ; पण नागपुरातील झिरो माइलचे ऐतिहासिक महत्त्व मात्र कायम राहिले. स्वातंत्र्यापूर्वीच्या अखंड भारताचे प्रतीक म्हणून आज झिरो माइलकडे बघितले जाते. ट्रिग्नोमेट्रिक सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या पाहणीनुसार नागपुरातील झिरोमाइलची समुद्र सपाटीपासून उंची १०२०.१७१ फूट आहे. तशी नोंद त्या ठिकाणी करण्यात आली आहे. झिरो माइलच्या उंच स्तंभाच्या बाजूला एक छोटा दगड आहे. हा दगड म्हणजे केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जाते. मोठ्या स्तंभावर चंद्रपूर , रायपूर , भंडारा , हैदराबाद या शहरांचे या स्थळापासूनचे मैलातील अंतर दिले आहे. झिरो माइलच्या मोठ्या स्तंभावर ज्या शहरांचे अंतर दर्शविले आहे ती शहरे नागपूरलगतचीच आहेत. झिरो माइल हा खरोखर देशाचा केंद्रबिंदू असता तर दिल्ली , चेन्नई या शहरांचेही अंतर स्तंभावर दाखविण्यात आले असते , असाही एक मुद्दा मांडला जातो.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°8'59"N   79°4'50"E
  •  19 किमी.
  •  126 किमी.
  •  256 किमी.
  •  262 किमी.
  •  293 किमी.
  •  374 किमी.
  •  526 किमी.
  •  546 किमी.
  •  698 किमी.
  •  887 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी