ज्ञानभवन राजभवन (पुणे)

India / Maharashtra / Pune / पुणे
 निवास, office of the governor (en)
 Upload a photo

ब्रिटिशांच्या काळात ही इमारत म्हणजे सत्तेचे केंद्र होते. याचे ज्ञानभवनात राजभवनारूपांतर झाले, ते पुणे विद्यापीठाच्या स्थापनेनंतर. १० फेब्रुवारी १९४९ रोजी विद्यापीठाची स्थापना झाली आणि १ जून १९४९पासून या वास्तूमध्ये विद्यापीठाचा कारभार सुरू झाला. विद्यापीठाची बहुतेक प्रशासकीय कार्यालये सुरुवातीला याच वास्तूत होती. विद्यापीठाचा व्याप वाढत गेल्यानंतर अन्य प्रशासकीय इमारती बांधल्या गेल्या; परंतु या वास्तूतील गजबजाट काही कमी झाला नाही.
कालांतराने या इमारतीतील लाकडी फ्लोअरिंग खराब होत गेले. इमारतही जीर्ण होत गेली. कोणत्याही स्वरूपाची तात्पुरती दुरुस्ती अजिबातच कामास येईनाशी झाली. सात-आठ वर्षांपूर्वी या इमारतीला भक्कम करण्याची आणि तिच्या रूपाने मिळालेला ' वारसा ' जपून ठेवण्याची चर्चा सुरू झाली. परंतु त्यानंतर दोन-तीन वर्षांनी इमारत पूर्णपणे ' धोकादायक ' बनली आणि त्यामुळे ती रिकामीच केली गेली. तिचे छत उतरविण्यात आले. ' कॅम्पस मेकओव्हर ' प्रकल्पाअंतर्गत इमारतीच्या सक्षमीकरणाचे काम राष्ट्रीय पातळीवरील संस्थेला कंत्राटाने देण्यात आले. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले.
पण, आज पाच वर्षांनंतर इमारत आहे तशीच आहे. तिचे काम ज्या संस्थेला दिले होते, तिने ते मधूनच सोडून दिले. अवास्तव कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या प्रयत्नात इमारतीचे नुकसान आणखी वाढत गेले. त्यामुळे नवीन कोणीतीही संस्था काम करण्यास धजेनाशी झाली आहे. म्हणूनच या इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होईल, याचे छातीठोक उत्तर कोणी देत नाही. पुढील वर्षाच्या डिसेंबरपर्यंत कदाचित पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जाते. मात्र, ते पूर्ण होईलच याची खात्री नसल्याचे विद्यापीठातील उच्चपदस्थ खासगीत सांगत आहेत आणि इमारत दुरुस्तीच्या पलीकडे गेल्याचे नमूद करीत आहेत.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°32'40"N   73°49'32"E
  •  11 किमी.
  •  114 किमी.
  •  170 किमी.
  •  324 किमी.
  •  478 किमी.
  •  569 किमी.
  •  704 किमी.
  •  746 किमी.
  •  824 किमी.
  •  882 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी