जिवती
India /
Maharashtra /
Chandur /
World
/ India
/ Maharashtra
/ Chandur
खेडेगाव, mandal headquarter (en)
ताल्युकातील राजुरा (कोरपना जिवती), जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र
जीवती तालुक्यात ही १४ गावे
महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवरील १४ गावांचा तिढाही त्यातलाच आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुक्यात ही १४ गावे येतात. आंध्रच्या विकास आराखड्याने आणि महाराष्ट्रातील आरोप-प्रत्यारोपांनी या गावांच्या मालकी हक्काचा धुरळा नव्याने उडू लागला. या गावातील लोकांना रेशनकार्ड, मतदान ओळखपत्रे, जातीची प्रमाणपत्रे आंध्र सरकारने दिलीच; पण महाराजगुडा ते मुकाद्दमगुडा या भागातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आंध्रने दीड कोटी रुपये मंजूर केले आहेत. अतिदुर्गम भागातील ही गावे हातची जाणार या भीतीपोटी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला आणि १४ गावांची चवदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली.
या १४ गावांतील लोक दोन्ही राज्यांच्या सोयी लाटत असल्याचे वक्तव्य आमदार सुभाष धोटे यांनी अलीकडेच केले. मात्र या वादग्रस्त भागाच्या मागासलेपणाचे कारण त्यांनी न सांगितल्याने लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. विविध सोयीसवलती मिळाल्याने या भागातील रहिवाशांत आंध्रविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे, तर लोकप्रतिनिधींच्या आरोपांनी जनता व्यथित झाली आहे, हेही खरे आहे. महाराष्ट्र सरकारने वेळीच रस्त्यांचे जाळे न विणल्याने आंध्रला आयती संधी मिळाली, हे सत्य नाकारता येणार नाही. आंध्रच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्रीयन नेत्यांना जाग येत असेल तर त्याचे खापर रहिवाशांवर कसे फोडणार?
जनभावना लक्षात घेऊन भारत सरकारने तत्कालीन हैदराबाद संस्थान खालसा केले. जनता निजामाच्या जोखडातून मुक्त झाली. नंतर विस्थापित म्हणून त्यांनी या भागाचा आसरा घेतला. आज निजाम नाहीत. त्यांच्याइतके अत्याचारही नाहीत. मागासलेपणाच्या खोल दु:खाने या प्रदेशातील पिढ्यांना हळवे करून सोडले आहे. मूलभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे जगण्यासाठीचा संघर्ष या पिढ्यांच्या अंगवळणी पडला. नव्या पिढीत बंडखोरी दिसेल असे भाकित अनेकांनी वर्तविले होते. कदाचित तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ही वास्तविकता हेरली असावी, म्हणूनच त्यांनी या गावांना आंध्रमध्ये समाविष्ट करण्याचे सूचविले होते. सरकार बदलले आणि प्रश्न तसाच राहिला. आता हा वादग्रस्त भाग आंध्रच्या खानापूर व चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघात येतो. गावांतील लोक या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान करतात. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जवळ आल्याने आंध्र सरकार आधी जागे झाले. या कनवाळू दृष्टीनेच अधिपत्याचा वाद गहिरा केला आहे. निवडणुका जवळ आल्या की मुद्यांचे राजकारण केले जाते. या धामधुमीत नागरिकांचे भरडलेपण दुर्लक्षित राहू नये.

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 19°36'40"N 79°4'7"E
Array
प्रतिक्रिया