डॉ. वसंत राव देशपांडे नाट्य सभागृह (नागपूर)

India / Maharashtra / Nagpur / नागपूर
 auditorium (en)  गट निवडा
 Upload a photo

कलाकारांना आणि राजकारण्यांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणारे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोडकळीस आले आहे. परंतु तरीही प्रशासनाने त्याविषयी दखल न घेतल्याने सभागृहाची अवकळा हा विषय अधिवेशनात
गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागपूर शहर विकास योजना २००४-२००५ अंतर्गत डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाचे
नूतनीकरण आणि वातानुकूलित करण्यात आले. त्याचा शुभारंभ २० ऑगस्ट २००४ रोजी झाला. त्यानंतर नागपुरातील लोकांना एक उत्तम सभागृह उपलब्ध झाले. आज त्या सभागृहाचे दर तीन तासांसाठी ११,३६० रुपये आहे. संपूर्ण दिवसभर
सभागृह हवे असल्यास संबंधितांना ४५ हजार रुपये मोजावे लागतात. १०२३ आसनक्षमता असलेल्या सभागृहातील सुमारे २५० ते ३०० खुच्र्या तुटलेल्या आहेत. काही खुच्र्या पूर्णत: तुटल्या आहेत. तर बहुतेक खुच्र्यांचे हात तुटले आहेत. फोमसुद्धा खराब झाली आहे. कार्पेट जागोजागी फाटलेले आहे. अंधारात कित्येक प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचे पाय कार्पेटमध्ये अडकून ते पडतात. सर्वांसमक्ष त्यांचा हा एकप्रकारचा अपमानच असतो. पण झाकली मूठ लाखांची म्हणूनच की उंदरांचा मुक्त संचार सुरू होतो. लोकांचे सर्व लक्ष
कार्यक्रमात असल्याने खाली पायाजवळ काय सुरू आहे त्याकडे दुर्लक्ष होते. अन् त्याच संधीचा गैरफायदा घेत उंदीर कडकडून चावा घेतात. सभागृहात दर्शनीभागात आणि आजूबाजूला घुशींनी मोठमोठाले खड्डे केले आहेत. याच काय पडलेली व्यक्ती त्याची तक्रार
करण्यास पुढे येत नाही. पर्यायाने सभागृहावर अवकळा येऊनही हा विषय थंड्याबस्त्यात राहावा यासंदर्भातही आश्चर्य व्यक्त होत आहेएकीकडे खुच्र्या तुटलेल्या, कार्पेट फाटलेले असताना सभागृहात कार्यक्रम ऐन रंगात आल्यावर घुशींचा आणि खड्ड्यातून घुशी बाहेर येतात आणि नंतर त्यांचा कार्यक्रम संपेपर्यंत मुक्त संचार सुरू असतो. ही सर्व परिस्थिती पाहता आता तातडीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाची दुरुस्ती युद्धपातळीवर होणे अगत्याचे झाले आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाची देखभाल आणि दुरुस्तीचे कार्य सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ मधील कार्यकारी अभियंत्याकडे असते. पण त्यांचेही सभागृहाच्या अवस्थेकडे होणारे दुर्लक्ष
नागपूरकरांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अधिवेशन काळात आमदार निवासांवर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव करीत दरवर्षी त्याला नववधूचे रूप दिले जाते. पण शासनासाठी कामधेनू असलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते. हा अन्याय आता तरी दूर व्हावा हीच अपेक्षा सामाजिक कार्यकत्र्यांनी व्यक्त केली आहे. वसंतराव देशपांडे सभागृहावर अवकळा घुशी आणि उंदरांचा
मुक्त संचार
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°9'1"N   79°3'54"E
This article was last modified 12 वर्षांपूर्वी