Wari Hanuman Mandir, वारी हनुमान मंदिर मठ Telhara Akola

India / Maharashtra / Telhara /
 Hanuman temple  Add category
 Upload a photo

अकोला, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यच्या सीमेवरील दगडी बांधणीचा शिवकालीन मठ हे पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहे. येथून वाहणाऱ्या वान नदीत बुडून १५ वर्षांत ५२ जणांचा बळी गेल्याची माहिती वान फाऊंडेशनला माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे. मात्र, सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्यासंदर्भात प्रशासनातील विविध विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने या पर्यटनस्थळी आणखी किती बळी जाणार, याबाबत भीती व्यक्त केली जात आहे.

सातपुडा पर्वत आणि वान अभयारण्याच्या पायथ्याशी व वान नदीच्या किनाऱ्यावर दगडी बांधणीचा शिवकालीन मठ आहे. अकोला, अमरावती व बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यच्या सीमा त्याठिकाणी एकत्र येतात. अभयारण्य, पर्वत आणि नदी यामुळे मठाच्या सभोवताली सुंदर निसर्गसौंदर्य असल्याने पर्यटकांची संख्या वाढतच चालली आहे. याशिवाय वर्षांतून पाच ते सहा उत्सव याठिकाणी होतात. मात्र, या पर्यटनस्थळाची सुरक्षा व्यवस्था शून्य आहे. येथील निसर्गसौंदर्य पाहून पर्यटकांना पोहण्याचा मोह आवरत नाही. वान नदीतील मामा-भाचा डोहात मृत्यूची भयकथा भयंकर आहे. या डोहाला अनेक दगडी कपारी आहेत आणि एकदा पर्यटक याठिकाणी अडकला तर थेट मृतदेह हाती लागतो, असाच अनुभव आहे. अलीकडच्या दोन महिन्यात याठिकाणी चार जणांचा बळी गेला. वर्षांतून किमान दहा बळी जातात.
Nearby cities:
Coordinates:   21°10'15"N   76°46'32"E
This article was last modified 6 years ago