माजलगाव धरण

India / Maharashtra / Majalgaon /
 खेडेगाव, धरण
 Upload a photo

माजलगावात डॉ. शरद पवार यांचे लहान मुलांचे हॉस्पिटल आहे. तालुक्यात त्यांची शेती आहे. पावसाळा संपला. यंदा माजलगाव धरणात फारसे पाणी आले नाही. हिवाळ्याच्या सुरवातीलाच येणाऱ्या मोठ्या दुष्काळाची चाहूल लागलेली. माजलगाव धरणात असलेला पाणीसाठा कमी होऊ लागला. धरणाखालची जमीन उघडी पडू लागली. धरणे , तलावांतील गाळ नागरिकांनी मोफत न्यावा , असे आवाहन प्रशासनाने केले. त्यानुसार पवारांनी अर्ज करून माजलगाव धरणातला गाळ नेण्याची परवानगी मागितली. जानेवारीच्या २५ तारखेला त्यांनी गाळ उपसायला सुरुवात केली. एक पोकलेन मशिन आणि बारा-पंधरा ट्रॅक्टर कामाला लावले. रोज बारा तास गाळाचा उपसा केला. दोन मार्चपर्यंत त्यांनी सुमारे १२ हजार ब्रास (सुमारे ११ हजार ट्रॅली) गाळ त्यांनी स्वखर्चाने नेला.
त्यांच्या या उपक्रमाला पाहून अनेक शेतकरी गाळ नेण्यासाठी पुढे आले. तालुका प्रशासनाने गाळ उपसण्याच्या कामासाठी वर्गणी देण्याचे आवाहन केले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातून गाळ उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या बारा दिवसांपासून हा उपसा सुरू झाला. माजलगाव धरणातून रोज एक हजार ब्रास गाळ उपसण्याचे काम सुरू आहे , अशी माहिती तहसिलदार महेश शेवाळे व तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी दिली. आतापर्यंत तालुक्यात सुमारे ३५ हजार ब्रास गाळ काढला आहे. येणाऱ्या तीन महिन्यांत सुमारे दोन ते अडीच लाख ब्रास गाळ उपसण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°9'37"N   76°11'16"E
  •  266 किमी.
  •  277 किमी.
  •  280 किमी.
  •  338 किमी.
  •  431 किमी.
  •  673 किमी.
  •  749 किमी.
  •  755 किमी.
  •  849 किमी.
  •  868 किमी.
This article was last modified 12 वर्षांपूर्वी