किल्ले दुर्गाडीवरील दुर्गाडी देवीच्या मंदिर (कल्याण)

India / Maharashtra / Ulhasnagar / कल्याण
 Durga temple (en)  गट निवडा
 Upload a photo

कल्याण शहराची शान असलेल्या आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले दुर्गाडीवरील दुर्गाडी देवीच्या मंदिराची लवकरच डागडुजी होण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाने या मंदिराच्या डागडुजीसाठी ३७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, महासभेच्या मंजुरीनंतर डागडुजीचा प्रस्ताव राज्याच्या पुरातत्त्व विभागाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. दुर्गाडी किल्यावरील दुर्गाडी देवीच्या प्राचीन मंदिराची नगरपालिका प्रशासनाने ४८ वर्षांपूर्वी डागडुजी केली होती. त्यानंतर हे मंदिर पुरातत्त्व विभागाकडे वर्ग करण्यात आले. मात्र मंदिराच्या डागडुजीकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे या मंदिराच्या गाभाऱ्याच्या छताला गळती लागली. पावसाळ्यात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना यामुळे त्रास होत आहे. त्यातच मंदिराच्या बाजूचा भाग ढासळला आहे. हे प्राचीन मंदिर अतिशय छोटे असून, या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लाखो भाविक या काळात दर्शनासाठी येतात. मंदिराला एकच द्वार असल्याने दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करणाऱ् आणि दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांना दाटीवाटीने प्रवेशद्वारातून ये- जा करावी लागते. यामुळे या मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°14'43"N   73°7'6"E
  •  16 किमी.
  •  97 किमी.
  •  110 किमी.
  •  229 किमी.
  •  462 किमी.
  •  570 किमी.
  •  811 किमी.
  •  848 किमी.
  •  920 किमी.
  •  987 किमी.
This article was last modified 9 वर्षांपूर्वी