जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्याल (दर्यापूर)

India / Maharashtra / Daryapur / दर्यापूर
 college of further education / higher education (en)  गट निवडा
 Upload a photo

दर्यापूर येथील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी "कॉलेज तळे' ही संकल्पना साकारली आहे. प्राचार्यांच्या या अभिनव उपक्रमाची विद्यापीठानेही प्रशंसा केली आहे.

जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभावीपणे राबवल्याने यावर्षी पाणीटंचाईच्या झळा कमी जाणवल्या. टॅंकरची संख्या सुद्धा अत्यल्प राहीली. जलयुक्त शिवार या योजनेतून प्रेरणा घेवून आपणही काहीतरी करायला पाहिजे असा विचार श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या दर्यापूर येथील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या मनात आला. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कॉलेज तळे करण्याचा निर्णय घेतला. आपल्या सहकारी प्राध्यापकांसोबत चर्चा करून त्यांनी मार्च महिन्यात नियोजन केले. यासाठी डॉ. अरूण चांदूरकर, डॉ. नरेंद्र माने व हेमंत राऊत यांच्या मार्गदर्शनात रासेयो अंतर्गत जे डी पाटील कॉलेजची इमारत व परिसरातील पाणी साठवण्यासाठी कॉलेज तळे तयार करण्यात आले.

अवघ्या तीन महिन्याच्या श्रमदानातून हे कॉलेजतळे साकारल्या गेले आहे. विशेष म्हणजे शासनाकडून कोणतेही अनुदान यासाठी घेतले नाही. केवळ प्राचार्यांची जिद्द, विद्यार्थी, शिक्षकांच्या श्रमदान व वर्गणीतून हे कॉलेजतळे तयार होवू शकले आहे. कॉलेज तळ्याची अभिनव संकल्पना राज्यात प्रथम साकारल्याबद्दल श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरूण शेळके, उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, सुरेश ठाकरे यांनी प्रशंसा केली केली आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°55'18"N   77°18'45"E
  •  381 किमी.
  •  389 किमी.
  •  455 किमी.
  •  478 किमी.
  •  493 किमी.
  •  811 किमी.
  •  857 किमी.
  •  954 किमी.
  •  1025 किमी.
  •  1076 किमी.
This article was last modified 7 वर्षांपूर्वी