Sateri Devi Mandir (Pandur)

India / Maharashtra / Kudal /
 मंदीर  गट निवडा
 Upload a photo

Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   16°2'47"N   73°41'49"E

प्रतिक्रिया

  • पणदूर, सुमारे ४५०/५०० वर्षापूर्वी हातेरी नदी किनारी वसलेले छोटेसे निसर्गरम्य टुमदार खेडेगाव. शांतताप्रिय, सुसंस्कृत लोकवस्ती असलेल्या या गावात शेतीबरोबरच माडा-सुपारीच्या आणि आंबा-काजूच्या बागा; तसेच जांभूळ, रातांबे, आवळे, चिंचा यांनी बहरलेली उदंड कवळकाड असलेला भापगिरी डोंगर आहे. भापगिरी डोंगराला समांतर असलेली हातेरी नदी यामधील एक ते दीड किलोमीटर रुंद आणि नऊ ते दहा किलोमीटर लांब पट्टा म्हणजे आमचे पणदूर गाव. सिंधुदुर्गनगरी [पूर्वीचे ओरोस] आणि कुडाळच्या मध्यावर राष्ट्रीय महामार्ग १७ वरचा 'पणदूर तिठा' हि ग्रामस्थांसाठी जवळची बाजारपेठ. श्री सातेरीदेवी, पणदूरची ग्रामदेवता. हातेरी नदी आणि कुडाळ, पावशीहून आलेल्या भंगसाळ नदीच्या संगमावर श्री सातेरीदेवीचे पुरातन मंदिर आहे. देवळासमोर नदीत असलेल्या देवलकोंडीत [जलकुंड] आंघोळ करून ओलेत्याने देवीस साकडे घातल्यास ती नवसाला पावते असा ग्रामस्थांचा दृढ विश्वास आहे. पुढे सुमारे चार किलोमीटर अंतरावर या नद्यांना आणावातून येणारी पीठढवळ नदी मिळते आणि पात्र विस्तीर्ण होते. पुढे हि कर्ली नदी म्हणून ओळखली जाते आणि देवबाग, मालवण येथे अरबी समुद्रास मिळते. फावल्या वेळात नदीत गळाने मासेमारी करणे हा ग्रामस्थांचा छंद कोकण रेल्वेने बांधलेल्या तळगाव-बाव पुलामुळे हिरावला गेला. भापगिरी डोंगर, गावाच्या मध्यभागी असलेला भापगिरी डोंगर हि गावाची शोभा आहे. दक्षिणोत्तर असणाऱ्या या लांबलचक डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीतील नैसर्गिक जंगल आहे. जंगलात विविध वनस्पती, यांच बरोबर बिबटे, भेकरे, ससे, पिसई, कटीन्दर, साळींदर, रानडुक्करे, कोल्हे आदी जंगली प्राण्यांचा मुक्त वावर असतो. मोर, रानकोंबडे, धनेश, गरुड, ससाणे, खंड्या, वेडाराघू मुबलक प्रमाणात आढळतात. साप-सरडे, घोरपडी तसेच पावसाळ्यात नदी किनारी कासव, सुसरी इ. सरपटणारे प्राणी कायम नजरेस पडतात.
  •  284 किमी.
  •  357 किमी.
  •  447 किमी.
  •  506 किमी.
  •  512 किमी.
  •  514 किमी.
  •  565 किमी.
  •  590 किमी.
  •  670 किमी.
  •  765 किमी.
This article was last modified 15 वर्षांपूर्वी